किरण खुडे,

राजगुरूनगर (हवेलीनामा प्रतिनिधी) : खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील घोटवडी येथे विहीरीत पोहायला गेलेल्या दहा वर्षीय शाळकरी मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. कैवल्य एकनाथ भोते (वय १० वर्षे, रा. वाशेरे – भोतेवाडी, ता. खेड) असे मृत मुलाचे नाव आहे.

वडील आणि भावासोबत तो विहीरीवर पोहायला गेला होता. जलजीवन मिशन योजनेअंतर्गत ही विहीर खोदण्यात आली होती. पोहताना पाण्याचा अंदाज न आल्याने कैवल्य खोल पाण्यात बुडाला. वन्यजीव रक्षक मावळ संस्था आणि लोणावळ्यातील शिवदुर्ग मित्र यांच्या पथकाने मुलाचा मृतदेह बाहेर काढला. तब्बल २४ तासानंतर त्याचा मृतदेह सापडला.

ही विहीर सुमारे ५o फूट खोल असल्याने स्थानिक ग्रामस्थांना मुलाचा शोध घेणे कठीण जात होते. घटनेची माहिती मिळताच खेड पोलिसांनी अग्निशामक दल आणि स्थानिक आपत्कालीन पथकाला पाचारण केले. विहिरीतील गाळ आणि खोलीमुळे शोधकार्यात मोठे अडथळे येत होते.या शोधमोहिमेत निलेश गराडे, गणेश गायकवाड, मयुर चौधरी, जिगर सोळंकी आणि राजेंद्र बंडगे यांनी सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *