पुणे (हवेलीनामा ऑनलाइन) लोणी काळभोर पोलीस स्टेशन हद्दीतील उरुळी कांचन पोलीस चौकीच्या परिसरात  शिंदवणे गावच्या हद्दीत मागच्या आठवड्यात दोन दिवसाचे स्त्री लिंगी जिवंत अर्भक सापडले होते या घटनेची उकल होण्या अगोदरच पुन्हा रविवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास डाळिंब रस्त्यावर आणखी एक पुरुष जातीचे मृत अर्भक आढळून आल्याने या परिसरात एकच खळबळ उडाली आहे.समाज नेमका कोणत्या स्तरास पोहोचतो आहे अशी तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. या क्रूर आणि निर्दयी घटनांचा पोलीस यंत्रणेने तपास लावून संबंधिताना योग्य शासन व्हावे अशी मागणी नागरिक करू लागले आहेत.
      पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास पोलीस चौकीत फोनद्वारे माहिती मिळाली कि, उरुळी कांचन परिसरातील डाळींबकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला एक पुरुष जातीचे अर्भक  अज्ञात व्यक्तीने टाकले आहे. यावर सहायक पोलीस निरीक्षक दादाराजे पवार, पोलीस उपनिरीक्षक नितीन शिंदे, सदाशिव गायकवाड, पोलीस हवालदार मेश्राम, हे खाजगी वाहनाने घटनास्थळी पोहोचले.
             पोलिस तेथे पोहोचले तेव्हा ते बालक बेशुध्द अवस्थेत पडलेले दिसुन आले त्याची पहाणी केली. ते संपूर्ण वाढ झालेले सुस्थितीत परंतु कुठलीही हालचाल होत नसल्याचे आढळले, त्यामुळे लगेच रुग्णवाहिका बोलावून त्यास ससून रुग्णालयात हलविले तेथे वैदयकीय अधिकारी यांनी ते उपचारापुर्वी मृत असल्याचे सांगितले.
          यावर पोलिसांनी परिसरात याबाबत सखोल चौकशी केली परंतु कसलीही माहिती मिळू शकली नाही त्यामुळे अज्ञात व्यक्तीच्या विरोधात लोणी काळभोर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *