किरण खुडे,

राजगुरूनगर (हवेलीनामा प्रतिनिधी) : येथील राजगुरुनगर एसटी आगारातील कर्मचाऱ्यांच्या वतीने सेवालाल महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

वरीष्ठ आगारव्यवस्थापक विद्या कदम, कनिष्ठ आगारव्यवस्थापक उज्वला कुटे यांनी सेवालाल महाराजांच्या प्रतिमेचे पूजन केले.

यावेळी बोलताना आगारव्यवस्थापक विद्या कदम म्हणाल्या, एसटी महामंडळात सर्व समाजबांधव एकत्रितपणे गुण्यागोविंदाने काम करत असतात. सेवालाल महाराज यांनी स्नेह, सलोखा, बंधुभाव जपून एकत्र काम करण्याचा विचार दिला आहे. त्याची जोपासना करून प्रवासी सेवा देत राहू असेही त्या म्हणाल्या.

कनिष्ठ आगारव्यवस्थापक उज्वला कुटे म्हणाल्या, येथील सर्वच कर्मचारी हे माणुसकी चांगुलपणा ठेवून अशा विविध महापुरुषांच्या जयंतीच्या निमित्ताने एका छत्रछायेखाली राहुन कार्यक्रम नियोजनबद्ध करतात.

वाहतूक नियंत्रक विष्णू राठोड म्हणाले की, बंजारा समाज बांधवांनी समाजसंघटन करून एकोप्याने राहावं. सर्व समाजबांधवांना सोबत घेऊन प्रामाणिकपणे भेदभाव न बाळगता वारकरी संप्रदाय जपावा अस वसा घेतलेले सेवालाल महाराज जयंती आपण साजरी करत असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमासाठी वाहतूक निरिक्षक नासीर हवालदार सहाय्यक वाहतूक निरीक्षक एम. एफ. सय्यद, कार्यशाळा अधिक्षक अनंत कुंदे, वरिष्ठ लिपिक स्नेहा कातोरे, अजिंक्य फलके, राजेंद्र कांबळे, प्रवीण झरांडे, राजेंद्र नजन, गजानन सांडभोर, प्रदिप गुट्टे, रविंद्र राठोड, शिवाजी खलुले, प्रकाश राठोड, दिगांबर पोटे, प्रशांत होले, राजाराम राठोड, माणिक थिगळे, गोविंद वरे, भारत सुरपाम आदी उपस्थित होते.

सुत्रसंचालन दत्तात्रय गभाले यांनी केले वरिष्ठ लिपिक स्नेहा कातोरे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *