थेऊर (हवेलीनामा वृतसमूह) घरात कोणी नसल्याचा फायदा घेऊन घराचे कुलूप तोडून घरातील मौल्यवान वस्तू पळविल्या मालिका घटनेची माहिती मिळतात तत्परता दाखवत केवळ दोन तासात संशयित गुन्हेगारास गजाआड करून त्याच्याकडून
४,२५,०००/- रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.
लोणी काळभोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कदम वाक वस्ती ग्रामपंचायत परिसरातील पठारे वस्ती येथील शांती शंकर सोलंकी त्यांचे घरास कुलूप लावून बाहेर गेले असताना अज्ञात चोरट्याने घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश करुन एकुण २,९०,०००/- रूपयाचे सोन्या चांदीचे दागिणे चोरी करून नेल्याचा लोणीकाळभोर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा नोंद केला.
तपास अधिकारी अनिल जाधव व तपास पथकास गोपनिय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की ही चोरी आदित्य अरुण गरड, वय १९ वर्षे, रा. फ्लॅट नं.३०५, शुभयोग रेसिडन्सी, कदमवाकवस्ती, याने केली आहे यावर तपास पथक या ठिकाणी जाऊन अवघ्या ०२ तासांत संशयीतास शिताफीने ताब्यात घेऊन त्यांचेकडे या चोरीच्या संदर्भात तपास केला असता त्याने गुन्हा केल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्याच्याकडुन लोणी काळभोर पोलीसांनी ३५ ग्रॅम सोन्याचे दागिणे व ५२० ग्रॅम चांदीचे दागिणे असा एकुण किंमत ४,२५,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करुन गुन्हा उघडकीस आणला आहे.
ही कामगिरी डॉ. राजकुमार शिंदे, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ०६, श्रीमती अनुराधा उदमले, सहा. पोलीस आयुक्त हडपसर विभाग यांचे मार्गदर्शनाखाली श्रीमती स्मिता पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे), लोणी काळभोर स्टेशन, अनिल जाधव, पोलीस उप निरीक्षक, पो. हवा. सागर जगदाळे, रामहरी वणवे, संभाजी देवीकर, अण्णा माने, पोलीस शिपाई प्रविण दडस, सुरज कुंभार, प्रशांत सुतार, सचिन सोनवणे, राहुल कर्डीले, अशोक गिरी या पथकाने केली आहे.
