थेऊर (हवेलीनामा वृतसमूह) हवेली तालुक्याच्या पूर्व भागामध्ये गेल्या काही महिन्यांपासून बिबट्याचा वावर वाढला होता यावर वन खात्याकडून वेगवेगळ्या प्रकारच्या उपाययोजना केल्यानंतर विशेषतः निवडणूक प्रक्रिये दरम्यान बिबट्याच्या बातम्या थोड्याशा कमी झाल्या होत्या परंतु निवडणुकीचा कार्यक्रम पूर्ण झाल्यानंतर पुन्हा बिबट्याची दहशत अनुभवास येत आहे पुणे शहरालगत असलेल्या मांजरी परिसरामध्ये एका शेतकऱ्याच्या घरासमोर बिबट्याचा वावर होत असल्याचे सीसीटीव्ही मध्ये कैद झाले आहे या बिबट्याने घरासमोर असलेल्या कुत्रा शिकार करून पळवल्याचे दिसून आले आहे.
पूर्व हवेलीतील काही भाग हा बिबट्यासाठी अत्यंत संवेदनशील समजला जात आहे या परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून आपल्या मुलांना एकटे मोकळे जोडणे अवघड झाले आहे. गेल्या दोन दिवसांपूर्वी या बिबट्याने एका शेतकऱ्याच्या घरासमोर असलेला कुत्रा यावर त्याने झडप घालून शेजारील शेतामध्ये घेऊन गेला त्यामुळे रात्री अपरात्री आपल्या शेतात अथवा अन्य कामासाठी बाहेर पडणे अवघड होत जात आहे त्यामुळे याकडे शासकीय यंत्रणांनी वेळीच योग्य पावले उचलावीत अशी परिसरातील नागरिकांची मागणी आहे.
