किरण खुडे,
राजगुरूनगर (हवेलीनामा प्रतिनिधी) : खेड पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा झेंडा फडकला असून पंचायत समितीवर एक हाती सत्ता आणण्यात आमदार बाबाजी काळे यांना घवघवीत यश मिळाले आहे. पंचायत समितीच्या १६ पैकी ९ तर जिल्हा परिषदेच्या ८ पैकी ५ जांगावर उबाठा शिवसेनेचे उमेदवार विजयी झालेले आहेत.

तसेच माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला पंचायत समितीत ६ जागा मिळाल्या तर जिल्हा परिषदेत ३ उमेदवार विजयी झाले आहेत. शिंदे शिवसेनेने पंचायत समितीत खाते उघडले असून त्यांचा एक सदस्य विजयी झाला आहे. आणि भाजपाला मात्र पुर्णतः अपयश आले आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतमोजणी येथील खेड तालुका क्रीडा संकुलात सोमवारी (दि.०९) सकाळी दहा वाजता सुरु झाली व नंतरच्या दिड तासात निकाल हाती येऊ लागले. अटीतटीच्या व तुल्यबळ प्रतिस्पर्ध्यांच्या या निवडणूकीच्या मतमोजणी प्रक्रीयेत काही गण व गटात चुरशीची लढत रंगली होती.
खेड जिल्हा परिषदेचे विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे –
वाडा – समीर सुपे ( राष्ट्रवादी ), कडूस – तनुजा घनवट ( उबाठा ), रेटवडी – दिप्ती भोगाडे ( उबाठा ), पिंपळगाव – विजयसिंह शिंदे पाटील ( उबाठा ), मेदनकवाडी – गणेश सर्जेराव अरगडे ( उबाठा ), पाईट – सुनीता शरद बुट्टे (राष्ट्रवादी), नाणेकरवाडी – गणेश बोत्रे ( राष्ट्रवादी), कुरुळी – विनया मुंगसे ( उबाठा).
खेड पंचायत समिती विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे – नाणेकरवाडी – रुपाली कांबळे, महाळुंगे -अश्विनी तरस, आळंदी ग्रामीण- निखिल थोरवे, मेदनकरवाडी- महेंद्र मेदनकर, कुरुळी- गौरी चंदन मुऱ्हे, काळुस- मंगेश सावंत, पिंपळगाव -विद्याताई मोहिते, मरकळ – प्रसाद घेनंद, रेटवडी – दिलीप डुबे, वाफगाव- ज्ञानेश्वर ढेरंगे, वाडा – मनिषा हिले, वाशेरे- दिनेश हांडे, पाईट- सारिका गोगावले, आंबेठाण – श्रद्धाताई मांडेकर, कडूस- शंकर कावडे, चास- कविता राक्षे.
विजयी उमेदवारांची कार्यकर्ते व ग्रामस्थांनी जल्लोषात मिरवणूक काढून स्वागत केले.
