थेऊर (हवेलीनामा वृतसमूह) उरुळी कांचन जिल्हा परिषद गटातील सोरतापवाडी गणात चौरंगी लढत होत असून भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना (UBT) या प्रमुख पक्षासमोर अपक्ष उमेदवार पूजा सणस यांचे आव्हान जबरदस्त असून मतदानासाठी केवळ दोनच दिवस शिल्लक आहेत. सर्वच राजकीय पक्ष आपापले दावे प्रतिदावे करत असले तरीही या अपक्ष उमेदवाराने या सर्वांना जेरीस आणले आहे. सर्वसामान्य जनतेने या अपक्ष उमेदवाराच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा निर्णय घेतल्यामुळे या गणाचा निकाल काय लागणार यावर तर्क वितर्क लावले जात आहेत.
पूर्व हवेलीत महायुतीतील दोन दिग्गज एकमेकासमोर उभे ठाकले असून भारतीय जनता पक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात सरळ लढत होत आहे या पाच जिल्हा परिषद गटांपैकी उरळी कांचन जिल्हा परिषद गटामधील सोरतापवाडी गणामध्ये काटे की टक्कर होताना दिसून येत असून या गणात भाजप राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना उभाटा या पक्षांचे उमेदवार मैदानात असले तरीही सर्व मतदारांचे लक्ष लागून राहिलेल्या अपक्ष उमेदवार पूजा सणस यांच्यावर विशेष लक्ष केंद्रित होत आहे कारण गेल्या अनेक दिवसांपासून त्यांनी या मतदारसंघांमध्ये आपणास उमेदवारी मिळावी यासाठी पूर्ण तयारी केली होती परंतु आयत्यावेळी अन्य उमेदवार दिल्याने त्यांची उमेदवारी कापली गेली यावर त्यांनी आपला उमेदवारी अर्ज अपक्ष म्हणून भरला त्यांच्या या निर्णयास मतदारा कडून चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे एकूणच या गणामध्ये सर्वच उमेदवारांकडून जोरदार प्रचार सुरू असून मतदानासाठी केवळ दोनच दिवस उरले आहेत.
