थेऊर (हवेलीनामा वृतसमूह) जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या रणधुमाळीत एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या पूर्व हवेलीत भाजपने जोरदार मुसंडी मारत जवळपास प्रत्येक जिल्हा परिषद गटात तुल्यबळ उमेदवार देऊन निवडणुकीत मोठी रंगत आणली आहे सर्वच राजकीय विश्लेषकांचे लक्ष लागून असलेल्या लोणी काळभोर कदम वाकवस्ती जिल्हा परिषद गटात खूपच मोठा ट्विस्ट दिसून येत असून या ठिकाणी मोठी राजकीय गणित जुळल्याने भारतीय जनता पक्षासाठी खूपच ताकद लागण्याची दिसून येत आहे.
लोणी काळभोर कदम वाक वस्ती जिल्हा परिषद गटासाठी भारतीय जनता पक्षाकडून देण्यात आलेल्या उमेदवार पुनम बाबुराव गायकवाड तसेच लोणी काळभोर वडकी पंचायत समिती गणासाठी सौ.श्वेता कमलेश काळभोर आणि कदमवाकवस्ती गणासाठी ज्ञानेश्वर नानगडे हे निवडणूक रिंगणात उतरलेले आहेत. यामध्ये निवडणूक प्रचारात सर्वच प्रमुख राजकीय पदाधिकारी उतरल्याने भारतीय जनता पक्षाला मोठी ताकद मिळाली आहे.
या रणधुमाळीस आजपासून रंगत येणार आहे.या प्रचारादरम्यान अनेक मुद्यावर चर्चा होईल. लोणी काळभोर मधील मात्तबर पदाधिकारी एकवटल्यामुळे येथे मोठा ट्विस्ट निर्माण झाला आहे. दौंडचे लोकप्रिय आमदार राहुल कुल यांनी हवेली तालुक्यात विशेष लक्ष घातल्यामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत चांगली कामगिरी होणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.
याबरोबरच उरुळी कांचन जिल्हा परिषद गटात शंकर बडेकर, केसनंद कोरेगाव मूळ मध्ये कविता विजय पायगुडे, थेऊर जिल्हा परिषद गटात सौ पुष्पलता प्रकाश सावंत तर पेरणे डोंगरगाव गटात किरण साकोरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या सर्वच गटात प्रचारात मोठी आघाडी घेत भाजप उमेदवारांना मतदारांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.
