थेऊर (हवेलीनामा वृतसमूह) पूर्व हवेलीतील तीर्थक्षेत्र थेऊर तसेच कोलवडी या गावच्या वार्षिक यात्रा राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या विमान अपघातात झालेल्या निधनामुळे स्थगित करण्यात आले असून या ठिकाणी होणारे सर्व सांस्कृतिक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत केवळ धार्मिक विधी पार पाडणार असल्याची माहिती यात्रा कमिटीच्या माध्यमातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे काल विमाना अपघातामध्ये दुःखद असे निधन झाले त्यामुळे संपूर्ण राज्यावर शोक कळा ओढवली राज्यातील जनतेवर दुःखाचा डोंगर कोसळला ही भावना संपूर्ण राज्यात असल्याने पूर्व हवेलीतील थेऊर व कोलवडी या दोन्ही गावांनी आपला वार्षिक उत्सव जो माघ शुद्ध पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो तो उत्सव स्थगित करण्यात आल्याची माहिती दोन्ही गावच्या यात्रा कमिटीच्या माध्यमातून प्रसिद्धी दिली आहे त्यामुळे या ठिकाणी होणारे सर्व सांस्कृतिक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहे केवळ धार्मिक विधी पूर्ण केले जातील याचे सर्व पंचक्रोशीतील भाविकांनी नोंद घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *