बारामती (हवेलीनामा वृतसमूह) महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या पार्थिवावर आज बारामतीच्या विद्या प्रतिष्ठान मैदानावर शासकीय हितमामात अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी संपूर्ण राज्यातील लाखो दादांचे चाहते बारामती मध्ये दाखल झाले होते सर्वांच्या डोळ्याच्या कडा पानावलेल्या आणि “अजित दादा अमर रहे” “दादा तुम्ही परत या” या घोषणांनी संपूर्ण विद्या प्रतिष्ठानचे मैदान दुमदुमून गेले.

अतिशय शिस्तप्रिय व कामावर प्रेम करणारा नेता काळाच्या पडद्याआड गेला राज्याचं न भरून येणार नुकसान झाल्याची जाणीव सर्वच राजकीय नेत्यांना व सर्वसामान्य नागरिकांना होत आहे “दादा तुम्ही परत या कुठल्यातरी रूपाने परत या” अशी आर्त साद दादाच्या सर्व लाडक्या बहिणी करताना दिसत होत्या. काल विमान अपघातामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा यांचे अपघाती निधन झाले आणि संपूर्ण राज्यासह देश सुन्न झाला एक जाणकार, अभ्यासू, शिस्तप्रिय असा नेता आपल्यातून गेल्याची भावना सर्वांना झाली बारामतीच्या या सुपुत्राने आपले नाव देशाच्या पटलावर अधोरेखित केले.

खरे तर बारामती आता पोरकी झाल्याची भावना तसेच निराधार झाल्याची भावना सर्वच बारामतीकरांच्या मनात आहे अगदी सर्वसामान्य नागरिक त्यांच्यावर खूप प्रेम करणारे होते अजित पवार आणि बारामती हे एक नाजूक असं नातं होतं आणि हे आता काळाच्या आड गेलेले दादा पुन्हा कोणत्या ना कोणत्या रूपाने परत यावेत अशीच या सर्वसामान्य बारामतीकरांची अपेक्षा आहे.

या अंत्यसंस्कारासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभेचे अध्यक्ष नार्वेकर, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यासह राज्याच्या मंत्रिमंडळातील अनेक गणमान्य व्यक्ती आमदार विविध संस्थांचे पदाधिकारी तसेच अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते विद्या प्रतिष्ठानचा परिसर लाखो दादांच्या चाहत्यांनी खर्च भरला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *