थेऊर (हवेलीनामा वृतसमूह) उरुळी कांचन सोरतापवाडी जिल्हा परिषद गटात आपला रंग चढू लागला असून भारतीय जनता पक्षाच्या जिल्हा परिषद तसेच पंचायत समिती उमेदवारांना मतदारांकडून भरघोस प्रतिसाद मिळत असल्याने या गटात तुल्यबळ लढत अपेक्षित आहे. या जिल्हा परिषद गटासह दोन्ही पंचायत समिती गणात भारतीय जनता पक्षाकडून तगडे उमेदवार दिल्याने येथे चूरशीची लढाई अनुभवास येत आहे.

प्रथमदर्शी उरुळी कांचन – सोरतापवाडी गटात राष्ट्रवादी काँग्रेसला पोषक चित्र दिसत होते परंतु तिकीट वाटपाच्या दरम्यान अनेक कार्यकर्ते नाराज झाले आणि या नाराजीचा फायदा भारतीय जनता पक्षाने उचलत त्यांना उमेदवारी देऊन या गटात रंगत आणली.त्यात सोरतापवाडी पंचायत समिती गणात पूर्व हवेलीतील एक बहुचार्चित चेहरा असलेले उमेदवार म्हणून सुदर्शन चौधरी यांना उमेदवारी दिलेली असल्यामुळे सोरतापवाडी ग्रामस्थ एकमुखी त्यांच्या पाठीशी उभे ठाकल्यामुळे या गणातून भाजपला मोठी आघाडी मिळणार आहे.

गावातील ज्येष्ठ नागरिक, महिला बचतगट, युवकवर्ग तसेच विविध सामाजिक संस्थांच्या उपस्थितीत झालेली बैठक केवळ औपचारिक चर्चा न ठरता ग्रामस्थ पातळीवर लोकभावनेचा संकेत देणारा महत्त्वपूर्ण क्षण ठरला. चौधरी यांच्या नावावर पडलेला एकमताचा शिक्का, स्थानिक राजकारणातील त्यांच्या वाढत्या प्रभावाचीच जणू घोषणा करतो.

सुदर्शन चौधरी हे सोरतापवाडीचे सरपंच असताना त्यांच्याकडून अनेक ग्रामविकासाची कामे झाली. खासदार ,आमदार फंड आणून गावाचा विकास केला .कौटुंबिक वारसा लाभल्याने सर्वसामान्यांशी आपुलकी राखण्याचा वारसा आणि तरुणांमध्ये असलेली मजबूत पकड या सकारात्मक मुद्याच्या जोरावर सुदर्शन चौधरी यांचे नेतृत्व गावकऱ्यांच्या विश्वासाचा केंद्रबिंदू ठरले आहे. रस्ते, पाणीपुरवठा, शिक्षण अशा मूलभूत सुविधा देत असतानाच कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक म्हणून निवड झाल्यानंतर कृषी क्षेत्रातील प्रलंबित प्रश्न सोडवण्याची त्यांची असलेली धडपड नागरिकांना विशेष महत्वाची वाटते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *