थेऊर (हवेलीनामा वृतसमूह) अष्टविनायक दर्शनासाठी काही युवक दुचाकी स्वारावरून दुचाकीवरून प्रवास करत श्री गजाननाचे दर्शन घेत निघाले असता थेऊर येथे श्री चिंतामणी गणपती दर्शन घेण्यासाठी येथे पोहोचले त्यावेळी त्यांच्याकडे असणारा किमती कॅमेरा गहाळ झाला यावर लोणी काळभोर पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या थेऊर पोलीस चौकीचे पोलीस अधिकारी पोलीस उपनिरीक्षक दिगंबर सोनटक्के व त्यांच्या सहकाऱ्यांनी तत्परता दाखवून तो कॅमेरा शोधण्यास मदत केली आणि तो संबंधित भाविकास परत केला पोलिसांनी तत्परता दाखवून वेळेवर केलेले सहकार्य यामुळे त्या भाविकांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून येत होते त्यांनी सर्व पोलीस कर्मचाऱ्यांचे मनस्वी आभार व्यक्त केले
मिळालेल्या माहितीनुसार संध्या खोडदे व अमित ऐतावडे हे दुचाकी वरून अष्टविनायक दर्शन करण्यासाठी निघाले त्यांनी चार गणपतीचे दर्शन करून थेऊर येथील श्री चिंतामणी गणपती साठी पोहोचले. मंदिरात प्रवेश केल्यानंतर त्यांनी हातपाय धुवून दर्शनासाठी मंदिरात गेले दर्शन झाल्यानंतर त्यांच्याकडे असणारा एक लाख तीस हजार रुपये किमतीचा कॅमेरा गहाळ झाल्याचे लक्षात आले यावर त्यांनी थेऊर पोलीस चौकशी संपर्क केला आणि मदतीसाठी विनंती केली यावर थेऊर पोलीस चौकीचे कार्य तत्पर पोलीस अधिकारी पोलीस उपनिरीक्षक दिगंबर सोनटक्के यांनी आपले सहकारी पोलीस हवालदार दिगंबर जगताप आणि चंद्रकांत माने पोलीस अंमलदार गणेश शिंदे थेऊर मार्शल हनमंत शिंगाडे, प्रसाद ताम्हाणे यांना मंदिरात शोध घेण्यासाठी पाठविले संपूर्ण मंदिराची पाहणी केल्यानंतर तो कॅमेरा आढळून आला.
