थेऊर (हवेलीनामा वृतसमूह) जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी पूर्व हवेलीत नेमकी काय परिस्थिती असेल याबद्दल भाष्य करणे अवघड होते कारण अनेक जिल्हा परिषद गटात व गणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निर्विवाद वर्षं वर्चस्व होते परंतु उमेदवारी अर्ज भरण्याच्या दिवसापर्यंत हे चित्र बदलले आणि सर्वच जिल्हा परिषद व पंचायत समिती गणात तुल्यबळ उमेदवार समोरासमोर आल्याने ही निवडणूक अतिशय चुरशीची होत आहे.कोरेगावमूळ – केसनंद जिल्हा परिषद गट सुरुवातीला एकतर्फी वाटत होता परंतु भाजपने दिग्गज उमेदवार उतरवल्याने ही निवडणूक आता रंगतदार होणार असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे . महायुतीतील दोन मित्र पक्ष समोरासमोर उभे राहिले असून भारतीय जनता पक्षाकडून जिल्हा परिषद सदस्य पदासाठी अधिकृत उमेदवारी सौ.कविता विजय पायगुडे यांना दिली असून केसनंद पंचायत समिती गणातून कुशाल गोरख सातव आणि कोरेगाव मूळ पंचायत समिती गणातून सूरज भालचंद्र चौधरी यांना उमेदवारी देण्यात आली या तगड्या उमेदवार या जिल्हा परिषद पंचायत समिती गणामध्ये निवडणूक रंगतदार होणार अशी मतदारांमध्ये चर्चा आहे.

जिल्हा परिषद गटासाठी दिलेला उमेदवार तसेच पंचायत समितीच्या दोन्ही गटासाठी दिलेले उमेदवार हे तुल्यबळ असल्याने होऊ घातलेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे पारडे जड होताना दिसत आहेत या मतदारसंघांमध्ये तगडी लढाई अनुभवास येणार असून ” आता वार फिरलय कमळ फुललं ” अशी नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे .

उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपकडून केसनंद – कोरेगाव मूळ जिल्हा परिषद गटासाठी अधिकृत उमेदवार म्हणून कविता विजय पायगुडे यांनी अर्ज दाखल केला.तसेच केसनंद पंचायत समिती गणातून कुशाल गोरख सातव यांना ए.बी.फॉर्म मिळाला तर कोरेगाव मूळ पंचायत समिती गणातून ए.बी.फॉर्म सूरज भालचंद्र चौधरी यांना मिळाल्याने दोघांची भारतीय जनता पक्षाकडून अधिकृत उमेदवारी जाहिर करण्यात आली. कुशल सातव व सुरज चौधरी यांनी पंचायत समिती निवडणूक लढवायचीच असा मनस्वी निश्चय केल्याने त्यांनी यासाठी गेले अनेक दिवसांपासून तयारी चालू केली होती या त्यांच्या प्रयत्नांना मूर्त स्वरूप देत भारतीय जनता पक्षाने त्यांना उमेदवारी बहाल करून त्यांना बळ दिले.

भाजपकडून उमेदवारी जाहिर झाल्यानंतर केसनंद-कोरेगाव मूळ जिल्हा परिषद गटात कविता विजय पायगुडे यांनी आपल्या प्रचाराला सुरुवात केली असून याआधी प्रचारात आघाडी घेतलेले केसनंद पंचायत समितीचे भाजपचे अधिकृत उमेदवार कुशाल गोरख सातव व कोरेगाव मूळ पंचायत समितीचे भाजपचे अधिकृत उमेदवार सूरज भालचंद्र चौधरी या दोघांची मोठी साथ कविता विजय पायगुडे यांना लाभली आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *