Screenshot

थेऊर (हवेलीनामा वृत्तसेवा) जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या मतदानाची तारीख जसजशी जवळ येत आहे तसा प्रचारामध्ये रंग चढताना दिसत असून उमेदवार आपापल्या परीने मतदारांपर्यंत पोहोचत असून मतदान करण्यासाठी विनंती करत आहेत. थेऊर जिल्हा परिषद गटामध्ये भाजपच्या अधिकृत उमेदवार सौ.पुष्पलता सावंत तसेच पंचायत समितीचे उमेदवार योगेश काकडे व कोलवडी, मांजरी, आव्हाळवाडी गणाच्या उमेदवार सौ पुनम गायकवाड यांच्या प्रचारासाठी महिलांनी प्रचार यंत्रणा हाती घेतली असून त्या घरोघरी भेटीगाठी देत मतदार संघाच्या सर्वांगीण विकासाच्या साठी तसेच महिलांना वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून मदत करण्यासाठी संधी देण्याचे आवाहन करत आहेत. मतदारसंघात शैक्षणिक कला क्रीडा या सर्व क्षेत्रांमध्ये बदल घडवून आणण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे चिन्ह लक्षात ठेवून मतदान करण्याचे आवाहन करत वाड्यावर त्यांवरून प्रचार करत होत्या. त्यांच्या या प्रचार फेरीला जोरदार प्रतिसाद भगिनींकडून मिळत आहेत बचत गटांसाठी केलेली विविध कामे तसेच शालेय विद्यार्थ्यांसाठी केलेली मदत आणि तरुणांसाठी केलेली कामे या कामांच्या जोरावर प्रकाश शेठ सावंत प्रतिष्ठानचा मोठं योगदान असून अनेक महिलांच्या कामाला या प्रतिष्ठानकडून हाती काम देण्यात आले आहे रोजगार उपलब्ध करून देण्यात या प्रतिष्ठानचा सिंहाचा वाटा असल्याचे या महिला घरोघरी जाऊन पटवून देत आहेत तसेच इथून पुढील काळात जिल्हा परिषद सदस्य पदी संधी दिल्यास थेऊर जिल्हा परिषद गटाचा कायपालट करून गाव तिथे वाचनालय गाव तिथे महिलांसाठी रोजगार व तरुणांसाठी रोजगार निर्माण करण्याची आश्वासन पुष्पलता सावंत यांना दिले असून “सबका साथ सबका विकास” हा नारा त्यांनी मतदारसंघांमध्ये लोकांच्या मनावरती बिंबवला आहे तरुण तरुणींना स्पर्धा परीक्षासाठी येत्या काळात अभ्यासिका उभारण्याचे आश्वासन दिले असल्यामुळे नव मतदार तरुण तरुणींमध्ये पुष्पलता सावंत यांना प्रतिसाद वाढत आहे हळदी कुंकू माध्यमातून महिलांची आपुलकीने विचारपूस करून महिलांना येणाऱ्या अडचणी तसेच रोजगार निर्मिती यावर भविष्यकाळात भर देणार असल्याचे प्रचार करताना या महिला सांगत आहेत त्यामुळे मतदारसंघात एकच चर्चा आहे वारं फिरलय कमळ ठरलंय असा नारा नागरिकच देत आहेत.

Screenshot

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *