थेऊर (हवेलीनामा वृतसमूह) पूर्व हवेलीतील जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वातावरण तापू लागले असून केसनंद-कोरेगाव मुळ जिल्हा परिषद गटातून भारतीय जनता पक्षाचे जिल्हा परिषद उमेदवार सौ.कविता विजय पायगुडे आणि कोरेगावमूळ पंचायत समिती गणातून सुरज भालचंद्र चौधरी यांची प्रचारात उभारी घेतली असून तरुण युवकांनी घरोघरी जाऊन नागरिकांशी संवाद साधत सर्वसामान्य मतदारांना कमळाला मतदान करण्यासाठी आवाहन केले.

एकेकाळी हवेली तालुक्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे निर्विवाद वर्चस्व होते याला भारतीय जनता पक्षाने खिळ घालण्यात यश मिळवले असून पूर्व हवेलीतील पाचही जिल्हा परिषद गटामध्ये पक्षाचे उमेदवार निवडणूक प्रचारात सरशी घेत असल्याचे चित्र दिसून येत आहे त्यामुळे येणाऱ्या निवडणुकात रंगत वाढणार आहे कोरेगाव मूळ केसनंद या जिल्हा परिषद गटातील जिल्हा परिषद उमेदवार सौ कविता विजय पायगुडे यांनी दोन्हीही पंचायत समिती गटातील आपले सहकारी उमेदवार यांच्या सहयोगातून प्रचारामध्ये जबरदस्त उभारी घेतली असून कार्यकर्त्यांचा ही या प्रचार कार्यामध्ये मोठा सहभाग होत आहे त्यामुळे “वारं फिरलं कमळ फुललं” अशी नागरिकांमध्ये चर्चा वाढली आहे.

केसनंद पंचायत समिती गणामध्ये भारतीय जनता पक्षाचे उमेदवार सुरज चौधरी यांच्या सहकार्यातून वाड्यावर – वस्त्या आणि गावांमधून प्रचार शिगेला पोहोचला आहे आणि याला नागरिकांकडून मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे दिसते. ज्येष्ठ नागरिक व वृद्ध माता यांना आपल्या पक्ष चिन्हाची ओळख करून आपणास मतदान करावे अशी विनंती उमेदवारांकरवी करण्यात येत आहे याला या ज्येष्ठ मंडळीचा आशीर्वाद मिळताना दिसतो.

देशात आणि राज्यात भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून चालू असलेल्या विकास कामांच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांचे जीवनमान उंचावणे वेगवेगळ्या शासकीय योजना तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचवणे यासाठी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांचे हात बळकट करणे महत्त्वाचे असल्याचे या प्रचारादरम्यान उमेदवार करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *