थेऊर (हवेलीनामा वृतसमूह) कोरेगाव मूळ पंचायत समिती गणातील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार सुरज चौधरी यांच्या प्रचारार्थ नायगाव पेठ व परिसरातील युवकांनी कंबर कसली असून उस्फूर्तपणे प्रचारामध्ये सहभागी झाल्याने परिसरामध्ये सर्व भाजपमय वातावरण झाले आहे. सर्वांच्या सहकार्यातून पंचायत समितीवर सुरज चौधरी यांना निवडून देण्याचा चंग बांधला आहे.नायगाव येथील युवकांनी गावातील प्रत्येक भागात जाऊन मतदारांना आपल्या उमेदवाराला साथ देण्याचे आवाहन केले.
पूर्व हवेली मध्ये निवडणूक प्रचाराला हळूहळू रंग चढत असला तरीही आपल्यावर झालेल्या अन्यायाचा आवाज पाडण्यासाठी अनेक उमेदवारांनी पक्षांतर करत निवडणूक रिंगणामध्ये आपले वर्चस्व दाखवून देण्यात सध्या मोठी चढाओढ लागल्याचे दिसून येत आहे. पूर्व हवेलीत कोरेगाव मूळ केसनंद जिल्हा परिषद गटामध्ये पेठ गावचे आदर्श सरपंच सुरज चौधरी यांनी भाजपचे कमळ हाती घेऊन पंचायत समिती निवडणुकीमध्ये उडी घेतली आहे गेल्या अनेक वर्ष जनसंपर्क असल्याने तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या मनात आपले स्थान निर्माण करण्यात त्यांना आलेले यश याच्याच जोरावर त्यांनी या पंचायत समिती निवडणूक मध्ये आपले नशीब आजमावण्याचे त्यांनी ठरवले आहे.
नायगाव पेठ व परिसरातील ज्येष्ठ मंडळींच्या मार्गदर्शनाखाली या निवडणुकीला सामोरे जाण्याचे निश्चित केले आहे. थोरा मोठ्यांचे मार्गदर्शन हेच आपल्या यशासाठी महत्वाचे ठरणार आहे असे सूरज चौधरी यांनी स्पष्ट केले.
