थेऊर (हवेलीनामा वृतसमूह) जागतिक पातळीवर देशाचे नावलौकिक उंचावण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदीजी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांच्या दूरदर्शी नेतृत्वातून प्रेरणा घेऊन, भारतीय जनता पार्टीचा लोकहिताचा विकासाचा वारसा अधिक बळकट करण्यासाठी तसेच केंद्र आणि राज्य यांच्या वेगवेगळ्या संकल्पना तळागाळातील सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी मी आणि माझ्यासोबत थेऊर आवळवाडी जिल्हा परिषद गट क्रमांक ४० व गणातील हजारो निष्ठावान कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीत अधिकृत प्रवेश केला असे उद्योजक प्रकाश सावंत यांनी पक्ष प्रवेश प्रसंगी आपली प्रतिक्रिया दिली.

या पक्षप्रवेश समारंभ प्रसंगी दौंड तालुक्याचे लोकप्रिय आमदार राहुल कुल तसेच पुणे जिल्हा भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष प्रदीप कंद आणि अनेक मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते यावेळी थेऊर आव्हाळवाडी जिल्हा परिषद गटातील जिल्हा परिषद उमेदवार सौ पुष्पलता प्रकाश सावंत तसेच कोलवडी – मांजरी – आव्हाळवाडी पंचायत समिती गणाच्या उमेदवार पूनम अशोक गायकवाड आणि थेऊर – कुंजीरवाडी – आळंदी म्हातोबा गणाचे उमेदवार योगेश दत्तात्रय काकडे तसेच केसनंद कोरेगाव मूळ जिल्हा परिषद गटातील कोरेगाव मूळ पंचायत समिती गणाचे उमेदवार सुरज चौधरी व त्यांच्या सहकाऱ्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला.

प्रत्येक गावाचा सर्वांगीण विकास, शेतकरी–महिला–युवकांसाठी संधी, मूलभूत सुविधांचा विस्तार आणि पारदर्शक प्रशासन हीच आमची तळमळ आहे. याच विश्वासातून “भारतीय जनता पार्टीचा विजय असो!” अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला आणि पुढील वाटचालीसाठी सर्वांकडून शुभेच्छांचा वर्षाव झाला.

निवडणूक प्रचारादरम्यान सर्व पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकजुटीने पक्षाच्या उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून देण्यासाठी कार्यरत राहण्याच्या सूचना आमदार राहुल कुल यांनी यावेळी दिल्या पक्षाच्यावतीने सर्वच उमेदवार यांना सर्व स्तरावरील प्रचार यंत्रणा पुरविण्यात येणार असून प्रत्येकाने आपापल्या परीने मतदारांपर्यंत जाऊन पक्षाची भूमिका व उमेदवार यांची सविस्तर माहिती पोहोचवावी असेही आवाहन त्यांनी केले.

भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप कंद यांनी या उमेदवारांचे पक्षात स्वागत करून भविष्यातील त्यांच्या वाटचालीस शुभेच्छा देत पक्ष वाढीबरोबरच हवेलीतील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक प्रक्रियेमध्ये असलेल्या सर्व उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून आणण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करावे असे आवाहन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *