थेऊर (हवेलीनामा वृतसमूह) पूर्व हवेलीतील रंगतदार लढाई मधील पंचायत समितीच्या गणात कोरेगाव मूळ गणात मोठे राजकीय घडामोडी घडल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खंदे समर्थक म्हणून गेली अनेक वर्ष कार्यरत असलेले आदर्श सरपंच सुरज चौधरी यांनी पक्षाकडून उमेदवारी नाकारल्यानंतर भारतीय जनता पक्षामध्ये जाहीर प्रवेश करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला या एका निर्णयामुळे नायगाव सह पेठ व परिसरातील नागरिकांमध्ये प्रचंड एकमताचे वातावरण दिसून आले आणि मिळालेल्या संधीचे सोने करून होणारी निवडणूक अत्यंत रंगतदार परिस्थितीत कुठल्याही परिस्थितीत जिंकायचीच असा प्रण केला.

नायगाव येथील मुख्य चौकामध्ये गावातील सर्व तरुण मंडळी एकत्र येत सुरत चौधरी यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून एकजुटीने त्यांना निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी मदत करायची अशी एक मुखी साद घालण्यात आली याला सर्व तरुणांनी “जय श्रीराम” च्या घोषणा देत पाठिंबा दिला यावेळी गावातील ज्येष्ठ मंडळी सह अनेक पदाधिकारी उपस्थित होते राष्ट्रवादी काँग्रेस कडून मिळालेल्या वागणुकीचे उत्तर निवडणुकीच्या माध्यमातून द्यायचे असे ठरले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *