थेऊर (हवेलीनामा वृतसमूह) जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत खरी लढाई महायुतीत दिसत असून काही ठिकाणी महाविकास आघाडीतील घटक पक्षाचे उमेदवार दिसत असले तरीही बहुतेक ठिकाणी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात सरळ लढाई होते आहे.

राज्यात ग्रामीण भागात पूर्वीपासून राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचा प्रभात होता परंतु गेल्या काही निवडणुकीत भाजपने आपली कामगिरी उंचावली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील उमेदवारीची स्पर्धा मोठी असल्यामुळे नाराज कार्यकर्त्यांना आपला राजकीय प्रवास पुढे चालू ठेवण्यासाठी वेगळा मार्ग निवडवा लागला. यातून या निवडणुकीत मोठी रंजक स्थिती निर्माण झाली आहे. या निवडणुकीत नाराज कार्यकर्त्याची सल कोणाच्या मुळावर ठरणार हे निवडणुकीनंतर कळेल.

पूर्व हवेलीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जास्त नाराजी नाट्य रंगले त्यामुळे अनेक घडामोडी घडल्या भाजपने या संधीचा योग्य उपयोग करून घेत निवडणुकीत रंगत आणली आहे. परिणामी काही गटात दुरंगी तर काही ठिकाणी तिरंगी लढती होताना दिसत आहेत. प्रचार जसा रंगात येईल तसे चित्र अधिक स्पष्ट होईल.

लोणी काळभोर, पेरणे गटात सध्यस्थितीत तिरंगी लढाई दिसत आहे तर उरुळी कांचन गटात तिरंगी किंवा चौरंगी लढाई होईल असे चित्र आहे.थेऊर, केसनंद कोरेगाव मूळ गटात दुरंगी लढाई अपेक्षित आहे.

पंचायत समिती निवडणूक उमेदवारी संदर्भात देखील याच प्रकारचे नाराजी नाट्य रंगले त्यामुळे येत्या 27 जानेवारी रोजी नेमके चित्र काय असणार हे कळून येणार असले तरी काही नाराज कार्यकर्त्यांनी आपला मार्गच बदलून निवडणूक लढवायचीच असा ठाम विश्वास केला आणि निवडणूक रिंगणात उतरले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *