किरण खुडे

राजगुरुनगर (हवेलीनामा प्रतिनिधी) खेड तालुक्यातील आंबोली गावच्या हद्दीत असलेल्या चीरंगा डोंगर परिसरात एका अज्ञात तरुणाचा निर्घृण खून झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांकडून तपास सुरू आहे. याप्रकरणी संशयीत आरोपी जयतु चिंधु बोरकर (रा. कोहींडे, ता. खेड.) याला खेड पोलीसांनी ताब्यात घेतले असून त्याच्याकडे चौकशी सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार आधारे खेड पोलीस स्टेशनच्या पथकाने संशयीत आरोपीसह घटनास्थळी जाऊन शोध घेतला असता, चीरंगा डोंगर परिसरात तरुणाचा मृतदेह आढळून आला.

मृत तरुणाचे नाव सुरज असून त्याचे पूर्ण नाव व पत्ता अद्याप समजला नाही. मृताचे वय अंदाजे २५ ते ३० वर्षे, रंग सावळा, उंची सुमारे १६८ सेंटीमीटर इतकी आहे. या मृत व्यक्तीचे कोणी नातेवाईक किंवा ओळखीचे व्यक्ती असल्यास, त्यांनी तात्काळ खेड पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *