दिपक खिलारे,
इंदापूर (हवेलीनामा प्रतिनिधी)
कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय इंदापूर येथील अर्थशास्त्र विभागाकडून अर्थशास्त्रीय सर्वसामान्य ज्ञान परीक्षेचे महाविद्यालयात शुक्रवार (दि.23) रोजी आयोजन करण्यात आले होते.
या परीक्षेसाठी महाविद्यालयातील कला विज्ञान आणि वाणिज्य शाखेतील 200 हून अधिक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. स्पर्धा परीक्षा ही काळाची गरज बनलेली असून त्यादृष्टीने विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, परीक्षेचे स्वरूप, वेळेचे नियोजन तसेच परीक्षेची तयारी कशी करावी हे उद्दिष्ट घेऊन सदर परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते.
या उपक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जीवन सरवदे यांनी शुभेच्छा दिल्या. तसेच महाविद्यालयात स्पर्धा परीक्षाभिमुख उपक्रम राबवून जास्तीत जास्त अधिकारी घडावेत अशी इच्छा व्यक्त केली.
अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. तानाजी कसबे यांच्या संकल्पनेतून सदर परीक्षा आकारास आली. या परीक्षेचे समन्वयक म्हणून प्रा. संभाजी ढुके यांनी काम पाहिले तसेच डॉ. गजानन कदम, प्रा.आजिनाथ चोरमले प्रा. सचिन आरडे यांनी सदर परीक्षा यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले.
सदर परीक्षेचे पर्यवेक्षण प्रा.प्रतिभा जैन प्रा.नीलम माने प्रा.सिद्धी बोराटे प्रा. नितीन गोरे प्रा. रमेश इंगळे तसेच प्रा. विशाल चव्हाण यांनी केले.
