अतुल देशपांडे,

सातारा (हवेलीनामा प्रतिनिधी): अनैतिक संबंधातून तिघांनी तरुणाचा निघृण खून केला. त्यानंतर लाकडे कापण्याच्या मशीनने मृतदेहाचे तुकडे केले. ही धक्कादायक घटना फलटण तालुक्यातील सोमंथळी येथे उघडकीस आली. याप्रकरणी फलटण ग्रामीण पोलिसांनी अवघ्या चार तासांत गुन्हा उघड करून एका महिलेसह तिघांना अटक केली आहे.

सतीश ऊर्फ आप्पा दादासाहेब दडस (वय २७, रा. सोमंथळी ता. फलटण) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. रेखा लक्ष्मण बुधावले, लखन बंडू बुधावले, सतीश तुकाराम माने (तिघे रा. मांगोबामाळ, बुधावले वस्ती, विडणी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.सतीश दडस हा बेपत्ता झाल्याची तक्रार बुधवारी (दि. २१) त्याचा भाऊ सागर दडस यांनी फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात दिली होती. पोलिसांना तपासादरम्यान विडणी येथील रेखा बुधावले हिचे सुरुवातीला सतीश माने याच्याशी प्रेमसंबंध होते नंतर तिचे सतीश दडस याच्याशी संबंध निर्माण झाले. त्यातूनच दोघांत वाद निर्माण होऊन खून झाल्याची माहिती समोर आली. यानंतर पोलिसांनी तिघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. यावेळी रेखाने गुन्ह्याची कबुली दिली.प्रेमसंबंधाच्या कारणावरून सतीश दडस, सतीश माने व लखन बुधावले यांच्यात वाद झाला होता. यावेळी सतीशला लोखंडी रॉडने मारहाण करून गंभीर जखमी केले. त्यानंतर रुग्णालयात नेत असल्याचा बनाव करून विडणी येथील मांगोबामाळ परिसरात नेऊन डोक्यात दगड घालून त्याचा खून केला.

खून केल्यानंतर रात्री तिघांनी लाकूड कापण्याच्या मशीनने सतीशच्या मृतदेहाचे तुकडे करून ते दोन पोत्यांत भरले. साठेगाव हद्दीतील एका शेततळ्यात तसेच नीरा नदीच्या पात्रात वेगवेगळ्या ठिकाणी मृतदेहाचे तुकडे टाकून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *