थेऊर (हवेलीनामा ऑनलाइन) कुंजीरवाडी येथील पर्यावरण फाऊंडेशनच्या वतीने नेहमी प्रमाणे सामाजिक उपक्रम आणि हरितग्राम संकल्पनेची चळवळ सुरु करण्याच्या दृष्टीने वृक्ष लागवड करुन महत्त्वाचे पाऊल उचलण्याचे काम पर्यावरण चळवळीतील वृक्ष प्रेमी करतात नवरात्री उत्सवाच्या घटाची वातावरणातील समतोल आणि  संतुलन राखुन घटाची इतरत्र होणारी विल्हेवाट आणि त्यामुळे पर्यावरणात होणारे प्रदूषण,नद्या, नाले , आणि सार्वजनिक ठिकाणी होणारी अस्वच्छता आणि दुर्गंधी आणि नकळत देवीच्या घटाची अवहेलना या उद्देशाने हा घट झाडांना समर्पित करून त्या झाडांना नवसंजीवनी देण्याचा हा नवीन उपक्रम राबविण्यात यशस्वी सुरुवात करण्यात आली.
        या उपक्रमाची संकल्पना कुंजीरवाडीचे ग्रामपंचायत सदस्य  हरिश गोठे , विशाल वाईकर यांनी  हा उपक्रम प्रत्यक्ष राबविण्यात सोनेरी गावचे सरपंच सचिन शिंदे ,सोनेरीचे उद्योजक काळे बंधु,दादा धुमाळ, निखिल  कुंजीर, सुभाष कुंजीर, काळूराम  कुंजीर ,बालाजी पवार , आणि  अनिल कवडे यांच्या योगदानाने  तसेच कुंजीर वाडी चे माजी सरपंच आणि तंटामुक्ती अध्यक्ष संतोष कुंजीर यांच्या उपस्थितीत पार पडला. तसेच पर्यावरण फाऊंडेशन या स्तुत्य उपक्रमाला फुरसुंगी गावचे उद्योजक शादाब मुलांनी ,  गायकवाड बंधु ,नंदकुमार बारवकर , वन अधिकारी  म्हस्के, विजय रणदिवे यांचे ही अनमोल सहकार्य लाभले या उपक्रमाला महाराष्ट्रभर चळवळीचे स्वरूप प्राप्त करण्याचा उद्देश असून झाडे लावा झाडे जगवा त्याचे आपल्या घरातील सदस्या प्रमाणे संगोपण करा ही काळाची गरज असल्याची मत गोठे यांनी व्यक्त केले
            महाराष्ट्र राज्यात पहिल्यांदाच अनोखा पर्यावरण पूरक उपक्रम पर्यावरण फाउंडेशन यांच्या घट समर्पण संकल्पनेतून राबविण्यात आला. नवरात्र उत्सव काळात अनेकांच्या घरात मंदिरात घट स्थापन करण्याची प्राचीन काळापासून प्रथा आहे. घट म्हणजे  शेतातील माती (वावरी) त्या मातीत गहू, तांदूळ, ज्वारी, हरभरा, करडई, जवस, मका, हुलगा अशा विविध प्रकारांचे धान्य मिसळवून मातीत रुजवली जातात व त्यावर एक छोटे मातीचे मडके ठेवून त्यात नारळ ठेवला जातो. अनेक पौष्टिक पदार्थ त्या मातीत मिसळल्याने त्या मातीची पौष्टिकता मोठ्या प्रमाणात वाढते. दररोज त्या घटाला विविध फुलांच्या माळा लावल्या जातात, घटाला नैवैद्य दाखवला जातो, त्या घटाची पूजा केली जाते. नऊ दिवस अशीही घटाची विधिवत पूजा केली जाते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *