दिपक खिलारे,

इंदापूर (हवेलीनामा प्रतिनिधी)

निरोगी आयुष्यासाठी योगाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे, याचा प्रत्यय कालठण नं.1 गावाच्या ग्रामस्थांना आला. पतंजली योग परिवार, कालठण नं. १ योगवर्गाचा प्रथम वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त दिनांक १६ ते १९ जानेवारी दरम्यान भव्य मोफत योग-प्राणायाम शिबीर मोठ्या उत्साहात पार पडले.

योगऋषी स्वामी रामदेव महाराज, आचार्य बालकृष्ण आणि इंदापूरचे योगरत्न दत्तात्रय अनपट यांच्या प्रेरणेने व जेष्ठ पत्रकार काकासाहेब मांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कालठण नं.1 येथे या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. गेली वर्ष भरापासून गावात योगवर्गाचे आयोजन केले जात आहे.

‌ यावेळी दत्तात्रय अनपट यांनी ‘योग आणि प्राणायामाचे महत्त्व’ यावर उपस्थितांना सखोल मार्गदर्शन केले. शिबिरात विविध स्पर्धांमधील विजेती २० वर्षीय युवा योगा आर्टिस्ट कु. सानिका संतोष जाधव हिने योगाची प्रात्यक्षिके सादर करून उपस्थितांची मने जिंकली. तसेच रविवारी (दि. १८) माजी नौसेना अधिकारी दत्तात्रय गायकवाड (पुणे) आणि देहूगावचे योग मार्गदर्शक नामदेवराव घोगरे यांनी ‘निरोगी जीवनासाठी योग व प्राणायाम’ या विषयावर विशेष मार्गदर्शन केले व प्रात्यक्षिके करून दाखवली. याच दिवशी सायंकाळी महिलांसाठी विशेष ‘हळदी कुंकू आणि तीळगूळ समारंभ’ आयोजित करण्यात आला होता. महिला वर्गाचा उस्फूर्त प्रतिसाद लाभला.

‌‌‌               शिबीराच्या सांगता समारंभाला इंदापूरचे डॉ. सुदिप ओव्हाळ यांनी ‘आहार, शारीरिक व्याधी व उपाय’ यावर अत्यंत मोलाचे मार्गदर्शन केले. सायंकाळी महिला व मुलांसाठी घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांमधील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. त्यानंतर ‘स्नेह भोजना’चा कार्यक्रम पार पडला.

या शिबीरास पतंजली योग परिवार इंदापूर,पतंजली योग परिवार शिरसोडी, पतंजली योग परिवार गलांडवाडी क्र.१, पतंजली योग परिवार कळाशी तसेच पतंजली योग परिवार कालठण चे योग साधक साधिकेंनी शिबीरात सहभाग घेतला . या संपूर्ण सोहळ्यासाठी पतंजली योग परिवार, कालठण नं1 व ग्रामस्थांचे मोलाचे सहकार्य लाभले. या कायक्रमाचे प्रास्ताविक जेष्ठ पत्रकार काकासाहेब मांढरे यांनी तर सूत्रसंचलन दत्तात्रय गायकवाड यांनी केले.

आरोग्याची चळवळ घराघरात पोहोचवणाऱ्या या उपक्रमाचे तालुक्यात सर्वत्र कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *