किरण खुडे

राजगुरुनगर ( हवेलीनामा प्रतिनिधी) : छाननी नंतर येथील खेड पंचायत समितीच्या ८ जिल्हा परिषद गटांसाठी एकूण ७४, तर पंचायत समितीच्या १६ गणांसाठी १६० अर्ज वैध झाले आहेत. जिल्हा परिषद गटांसाठी एकूण ७७ तर गणासाठी १६३ अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी छाननीत गण व गटात प्रत्येकी ३ अर्ज बाद झाले आहेत.

यात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षांच्या माध्यमातून सर्व गट आणि गणांत उमेदवार देण्यात आले आहेत. भाजपच्या माध्यमातून ७ गट आणि १३ गणांत उमेदवार दिले आहेत. तर एकनाथ शिंदे सेनेकडून ५ गट आणि १४ गणांत उमेदवार देण्यात आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून एकही उमेदवार दिलेला नाही.

वाडा – वाशेरे गटः समीर सुपे (राष्ट्रवादी), डॉ. संतोष सुपे (शिवसेना), विठ्ठल वनघरे (शिवसेना-उबाठा); चास – कडूसः तनुजा घनवट (शिवसेना-उबाठा), वसुधा राक्षे (राष्ट्रवादी), अनुजा जाधव (भाजप); वाफगाव – रेटवडीः अश्विनी पाचारणे (राष्ट्रवादी), दिप्ती भोगाडे (शिवसेना-उबाठा), रोहिणी थिगळे (शिवसेना), श्रध्दा सांडभोर (भाजप); पिंपळगाव तर्फे खेड मरकळः विजयसिंह शिंदे पाटील (शिवसेना-उबाठा), श्रीनाथ लांडे (शिवसेना), विष्णुदास थिटे (भाजप); कुरुळी -आळंदी ग्रामीणः विनया मुंगसे (शिवसेना-उबाठा), शितल येळवंडे (राष्ट्रवादी), कल्पना गवारी (भाजप); नाणेकरवाडी – म्हाळुंगेः गणेश बोत्रे (राष्ट्रवादी), जीवन खराबी (शिवसेना-उबाठा), संदीप सोमवंशी (भाजप), गणेश नाणेकर (शिवसेना); पाईट -आंबेठाणः सुनीता बुट्टे पाटील (राष्ट्रवादी), राजश्री जैद (शिवसेना-उबाठा), निशा गोरे (शिवसेना), माया डांगले (भाजप); काळूस -मेदनकरवाडीः गणेश आरगडे (शिवसेना-उबाठा), विनोद टोपे (राष्ट्रवादी), दत्तात्रय खांडेभराड (भाजप). व इतर उमेदवारांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केले आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *