किरण खुडे

राजगुरुनगर : (हवेलीनामा प्रतिनिधी) : इंधनासाठी आपल्याला इतर राष्ट्रांवर अवलंबून राहत असल्यामुळे इंधनाची बचत करण्याची सवय सर्वांनी स्वतःपासून लावणे गरजेचे आहे ; असे प्रतिपादन राजगुरुनगर एसटी आगाराच्या पालक अधिकारी तथा पुणे विभागीय यंत्र अभियंता श्रीमती स्मिता कुलकर्णी यांनी येथील राजगुरुनगर एसटी आगारात बोलताना व्यक्त केले.

येथील राजगुरुनगर एसटी आगारात इंधन बचत मोहीम तथा कर्मचाऱ्यांकरिता मोफत आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपिठावर आगारव्यवस्थापक उज्वला कुटे, डॉ.डी. वाय. पाटील मेडिकल कॅम्पच्या डॉ. श्रीमती मानवीका, डॉ. पारस शहा, डॉ. शॉरण गोमेस, डॉ. विजयंत मलिक, ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या राधिका दीदी, विभागीय भांडार अधिकारी नितीन आढाव, प्राचार्य लक्ष्मण वाळुंज, शिबिर संयोजक निखिल पाटोळे, वसंत वाल्हेकर, ब्लड बँकेचे बालाजी दराडे, सहायक वाहतूक निरीक्षक एम. एफ. सय्यद, स्थानक प्रमुख उत्तम लांडे, कार्यशाळा अधिक्षक अनंत कुंदे आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना श्रीमती कुलकर्णी म्हणाल्या, लहान मोठी कामे, जवळच्या अंतरावरची कामे करण्याकरिता गाडीचा वापर न करता पाई फिरून करावी. प्रवासाकरिता एसटी सारख्या सुरक्षित व सार्वजनिक वाहनाचा वापर करावा आणि इंधनाकरिता मोठ्या प्रमाणात जाणारे आपले परकीय चलन वाचवून आपण या प्रकारे आपल्या देशाची सेवा करू शकतो, असेही त्या म्हणाल्या.

आगारव्यवस्थापक उज्वला कुटे म्हणाल्या, इंधनाचे साठे मर्यादित आहेत. एसटी बस चालकांनी सिग्नलच्या ठिकाणी तसेच काही वेळ थांबावे लागणार आहे, अशा ठिकाणी आपली गाडी बंद ठेवावी. व इंधनाची बचत करावी इंधनाचा प्रत्येक थेंब हा मौल्यवान आहे. भविष्याचा विचार करून आपण सर्वांनी इंधनाची बचत करावी. असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

यावेळी राधिका दीदी, प्राचार्य लक्ष्मण वाळुंज यांची भाषणे झाली. कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. प्रास्तावीक वरिष्ठ लिपिक स्नेहा कातोरे यांनी केले. सूत्रसंचालन दत्तात्रय गबाले यांनी केले. कार्यक्रमानंतर कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. तर २० कर्मचाऱ्यांनी रक्तदान केले.

कार्यक्रमाचे संयोजन लिपिक पुष्पा चासकर स्नेहा कातोरे, लेखापाल हिरामण दिघे, निलम वाळुंज, रोहीणी साबळे, स्वाती बिराजदार, पुष्पा चासकर, रंजना बिराजदार, श्याम बडगीर, मनिषा सुतार, दिगंबर पोटे, गुलाब तिटकारे, रविंद्र राठोड यांनी केले.

यावेळी इंधन बचतकामी मोलाची मदत करणारे आदर्श चालक दशरथ लांडे, गणेश सुर्यवंशी, सुखदेव कुटे आदी कर्मचाऱ्यांना सन्मानित करण्यात आले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *