थेऊर (हवेलीनामा वृत्तसमूह) थेऊर पंचायत समिती गणात निवडणुकीच्या अनुषंगाने जबरदस्त चुरस निर्माण होते आहे, या गणात रंगतदार लढाई अपेक्षित असून सिध्दांत तुपे यांनी श्री चिंतामणी मंदीरात नारळ वाढवून प्रचाराला सुरुवात केली थेऊर, कुंजीरवाडी आणि आळंदी म्हातोबा या गावांमध्ये प्रत्यक्ष मतदारांच्या गाठीभेटी घेऊन संवाद साधला जात असून त्यास मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. निष्कलंक, उच्चशिक्षित अनुभवी वरिष्ठांचे मार्गदर्शन असणारा युवा चेहरा म्हणून मतदारांचा वाढता पाठिंबा त्यामुळे सिद्धांत तुपे यांनी वातावरण निर्मिती करण्यात यश मिळवले असल्याचे चित्र गणात तयार झाले आहे.

सिद्धांत याने आपल्या लहानपणापासून राजकारणाचे धडे गिरवले आहेत. त्याचे आजोबा दादा तुपे या नावाने परिसरात अतिशय दानशूर व्यक्ती म्हणून प्रसिद्ध आहे तसेच त्यांनी कुंजीरवाडी गावचे सरपंच पद भूषवले असून वडील सचिन तुपे हे देखील कुंजीरवाडीचे सरपंच होते तसेच आत्या सुनिता धुमाळ यांनी देखील कुंजीरवाडी गावच्या सरपंच म्हणून काम केले आहे.गावच्या राजकारणाचा अभ्यास लहान वयातच होत असल्याने तळागाळातील सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचता आले अनेक वेळा प्रत्यक्ष काम करण्याची संधी देखील मिळाली याच अनुषंगाने ठेवून कुंजीरवाडी आळंदी मातोबा या पंचायत समिती गणातून सर्वसाधारण गटातून निवडणूक लढविण्या साठी अनेकांकडून होत असलेली मदत यातूनच या निवडणुकीमध्ये प्रत्यक्ष उतरण्याची तयारी सिद्धांत तुपे यांनी केली.

अतिशय मित्त स्वभाव्य असणारे व गोरगरिबांच्या हाकेला धावणारे हे कुटुंब राजकारणात आपलं नशीब आजमावत आहे हवेली तालुक्याच्या इतिहासात पहिल्यांदाच सरपंच म्हणून आजोबा वडील आणि आत्या असा त्रिवेणी संगम म्हणून लाभलेलं बाळकडू सिद्धांत तुपे यांची जमेची बाजू असून मतदारसंघात असणारी नातीगोती त्यातच आजोळी लाभलेल्या संप्रदायिक वारसा यात थेऊर मधील पहिल्या गणेश कथाकार रुक्मिणी एकनाथ तारू व हरिभक्त पारायण एकनाथ महाराज तारू याचा देखील सिद्धांत तुपे यांना फायदा होणार आहे. तर सिद्धांत तुपे यांची आजी माजी सरपंच संगीता गोविंद तारु याचा देखील थेऊरमध्ये निश्चितच फायदा होणार आहे पहिल्यापासूनच तुपे कुटुंब हे राजकारणात सक्रिय असून अनेक पदे भूषवली आहेत त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांशी त्यांची नाळ घट्ट असून अहोरात्र नागरिकांची कामे करणे तसेच सुनीता धुमाळ यांच्या माध्यमातून महिलांचे सबलीकरण व महिलांसाठी राबवलेले विविध उपक्रम यामुळे महिला संघटित करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे आणि कुंजीरवाडीत सरपंच पदाच्या कार्यकाळात केलेली विविध विकास कामे यामुळे याचा फायदा देखील तुपे यांना होणार आहे सध्या तरी पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये चुरस अनुभवास मिळत असून वातावरण निर्मिती करण्यात सिद्धांत तुपे यांना यश आलेला आहे.

माजी सरपंच सचिन तुपे हे पुणे सोलापूर महामार्गवरील थेऊर फाटा येथे नेहमीच सामाजिक कार्यात सक्रिय असतात शैक्षणिक, धार्मिक, कला – क्रीडा या सर्व क्षेत्रात सर्वत्र कार्यकर्त्यांना मदतीचा हात देतात व थेऊर फाटा येथे कुठलीही घटना घडली अगदी वाहतूक कोंडी असो अथवा अपघातात जखमी झालेल्या नागरिकांना तात्काळ वैद्यकीय मदत करुन अनेकांना त्यांनी जीवदान दिलेले आहे वेळेत उपचार मिळण्यात त्यांचा फार मोठा महत्वपूर्ण वाटा असतो असे नागरिक सांगतात त्यामुळे एक सुसंस्कृत व उच्चशिक्षित तरुण पंचायत समिती साठी आपले नशीब आजमावत आहे त्यामुळे मतदार नेमकं कोणाच्या पारड्यात मतदान टाकणार हा येणारा काळच ठरवणार आहे परंतु आता तरी सिद्धांत तुपे यांनी वातावरण निर्मिती केलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *