थेऊर (हवेलीनामा वृतसमूह) प्रगत राष्ट्राच्या उभारणीमध्ये महिलांचा सहभाग अनन्यसाधारण असून त्यांच्या शैक्षणिक व शारीरिक सबलीकरणासाठी श्री प्रकाश शेठ सावंत प्रतिष्ठान माध्यमातून शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थिनींसाठी शैक्षणिक दर्जा उन्नत करण्यासाठी तसेच शारीरिक सबलीकरणासाठी विशेष महत्त्व देऊन येत्या काळात थेऊर आव्हाळवाडी जिल्हा परिषद गटातील महिलांना आर्थिक पाठबळ देऊन सक्षम करणार अशी ग्वाही प्रकाश सावंत यांनी दिली.
शिवछत्रपती कुस्ती संकुलाच्या माध्यमातून पुरुषांची मक्तेदारी असलेल्या रांगडया मातीतील खेळास अर्थात कुस्तीमध्ये महिलांचा तितकाच महत्त्वाचा वाटा असल्याचे दाखवून देताना या संकुलांच्या माध्यमातून परिसरातील मुलींना मैदान उपलब्ध करून त्यांना आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धांमध्ये संधी उपलब्ध करून देण्याचे काम श्री प्रकाश सावंत व त्यांच्या पत्नी सौ पुष्पलता सावंत यांनी गेली नऊ ते दहा वर्षापासून चालू ठेवले आहे या सर्वांची परिमिती म्हणजे पहिली महिला महाराष्ट्र केसरी प्रतीक्षा रामदास बागडी याच शिवछत्रपती कुस्ती संकुल ची कन्या झळकली त्यामुळे या कुस्ती संकुलाच्या शिरपेचात एक अभिमानास्पद विजयी तुरा खवला गेला. सध्या या संकुलामध्ये ४५ मुली कुस्तीचे धडे घेत असून त्यांच्या दैनंदिन कसरती पासून त्यांच्या आहाराची व्यवस्था देखील या संकुलाच्या माध्यमातून केली जात आहे, स्वप्न एकच मनी बाळगले आहे की,या महिला कुस्तीपटूंनी राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर राज्याचे तसे देशाचे नाव उंचावणे आहे हा एकमेव उद्देश आहे.

यावर बोलताना प्रकाश सावंत म्हणाले की, जर आपल्या माध्यमातून देशाचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकले तर ही एक देशाची सच्ची राष्ट्रसेवा घडणार आहे यासाठी या मुलींच्या माध्यमातून ऑलिंपिक सारख्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये उतरून देशाचे व आपल्या संकुलाचे नाव अभिमानाने घ्यावे एवढीच अपेक्षा बाळगून आम्ही आमच्या कुटुंबासह या विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी रात्रंदिन प्रयत्न करत आहोत.
समजसेवेचे हे वृत घेऊन गेल्या अनेक वर्षांपासून गावातून राजकीय कारकिर्दीला केलेली सुरुवात आता तालुका आणि जिल्हा पातळीपर्यंत पोहोचवून सर्वसामान्य नागरिकांना आधार देण्याचे काम करायचे आहे यासाठी पंचायत समितीवर थेऊर कुंजीरवाडी आळंदी म्हातोबा गणातून योगेश दत्तात्रय काकडे तर कोलवडी मांजरी आव्हाळवाडी गणातून सौ.पूनम अशोक गायकवाड यांच्या साथीने थेऊर आव्हाळवाडी जिल्हा परिषद गटात श्री प्रकाश सावंत यांच्या पत्नी सौ. पुष्पलता प्रकाश सावंत या निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत. यामुळे या गटातील चित्र अतिशय रंगातदार स्थितीत आलेले आहे.
