थेऊर (हवेलीनामा वृतसमूह) अलीकडच्या काळात विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धात्मक परीक्षेची आवड निर्माण झाल्याने जागोजागी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्गाची स्पर्धाच लागलेली आहे विशेष करून पुणे मुंबई सारख्या महानगरात हजारो विद्यार्थी केंद्रीय लोकसेवा आयोग त्याचप्रमाणे महाराष्ट्र लोकसेवा आयोग व इतर स्पर्धा परीक्षेची तयारी करताना दिसत असतात पुणे शहरा आजूबाजूचे ग्रामीण भागातून येणाऱ्या विद्यार्थी अशा या स्पर्धात्मक युगामध्ये टिकून राहिला पाहिजे यासाठी त्यांच्या परिसरामध्ये शहरात उपलब्ध असणारी साधने ग्रामीण भागातच उपलब्ध झाली तर या भागातून पुढे येणारा विद्यार्थी नक्कीच या स्पर्धात्मक युगात आपले चमक दाखवणार कोणी हेच लक्ष डोळ्यासमोर थेऊर ओव्हाळवाडी जिल्हा परिषद गटामध्ये सहा गावांसाठी दोन सुसज्ज ग्रंथालय व अभ्यासिका उभ्या करण्याची मानसिकता श्री प्रकाश शेठ सावंत प्रतिष्ठानच्या माध्यमातून केली जाणार असल्याचे उद्योजक प्रकाश सावंत यांनी सांगितले.
जिल्ह्याचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी ग्रामीण भागामध्ये काम करण्याची आवश्यकता आहे यासाठी आपल्या हक्काचा उमेदवार जिल्हा परिषद मध्ये प्रतिनिधी म्हणून पाठवला तर आपल्या सर्व गरजा वेळेत पूर्ण होऊ शकतात यासाठी श्री प्रकाश सावंत यांच्या पत्नी सौ पुष्पलता प्रकाश सावंत यांच्या माध्यमातून थेऊर आव्हाळवाडी जिल्हा परिषद गटातून निवडणूक रिंगणामध्ये उतरले आहेत.
पुणे शहरालगत असलेल्या या जिल्हा परिषद गटामध्ये पुणे सोलापूर महामार्गावरील तीन गावे तर वाघोली शेजारील आव्हाळवाडी, मांजरी आणि कोलवडी अशी तीन गावे असा हा जिल्हा परिषद गट असून नागरिकरणाबरोबर आर्थिक विकास साधत असणारे ही गावे आहेत झपाट्याने वाढणारी लोकसंख्या आणि त्यांच्या मूलभूत गरजा भागवताना स्थानिक स्वराज्य संस्थांवर पडत असलेल्या ताण या सर्व गोष्टींची जबाबदारी भविष्यात जिल्हा परिषदेच्या माध्यमातून उचलण्यासाठी एक भक्कम व अभ्यासू अनुभव संपन्न प्रतिनिधी पाठविल्यास परिसराचा कायापालट होण्यास निश्चित मदत होणार आहे.
जिल्हा परिषदेत सोबतच पंचायत समितीचे उमेदवार असलेले पूनम अशोक गायकवाड आणि योगेश दत्तात्रय काकडे यांच्या माध्यमातून देखील पंचायत समिती स्तरावरील सर्व योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत होणार आहे.
