थेऊर (हवेलीनामा वृतसमूह) नायगाव ग्रामपंचायत च्या वतीने नवीन ग्रामपंचायत कार्यालय उद्घाटन समारंभ शिरूर हवेली चे कार्यसम्राट आमदार ज्ञानेश्वर ऊर्फ माऊली कटके यांच्या सुविधा पत्नी सौ. मनीषा कटके यांच्या हस्ते तसेच तालुकाध्यक्ष दिलीप वाल्हेकर , संदीप गोते, स्वप्निल कुंजीर, गणेश चौधरी, व गुलाब आबा चौधरी, दादासाहेब चौधरी, रघुनाथ अण्णा चौधरी, अलंकार कांचन यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
ग्रामपंचायत विस्तारित कामासाठी आमदारांनी ४० लाखाचा निधी मंजूर केला असून या पुढील काळात गावच्या सर्व प्रकारच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी आवश्यक ती सर्व मदत आमदार माऊली कटके यांच्याकडून होईल असे आश्वासन सौ मनीषा कटके यांनी दिले.
ग्रामपंचायत कार्यालयाचे काम उत्कृष्ट केल्या बद्दल सरपंच व ग्रामपंचायत कमिटी, शाखा अभियंता , ठेकेदार यांच्या कामाचे कौतुक दिलीप वाल्हेकर यांनी केले. व गावासाठी भरीव निधी व मदत करण्याचे सर्वच मान्यवरांनी आश्वासित केले. याप्रसंगी सरपंच कल्याणी संदीप हगवणे, उपसरपंच दत्तात्रय बारवकर, सदस्य गणेश गुलाब चौधरी, जितेंद्र पांडुरंग चौधरी, उत्तम नाना शेलार, अश्विनी योगेश चौधरी, पल्लवी गायकवाड, संगीता शेलार, बाळासाहेब गायकवाड, प्रियंका गायकवाड ,आरती चौधरी ग्रामसेविका विजया भगत उपस्थित होते. तसेच कृष्णआप्पा चौधरी, पोपट चौधरी, विकास चौधरी, विजय चौधरी, सचिन हगवणे, दत्तात्रय गुळुंजकर, अर्जुन पवार, शाखा अभियंता थडकर, तलाठी महादेव भारती, ठेकेदार संतोष बोधे ,
नामदेव चौधरी, ज्ञानेश्वर शेलार, संतोष हगवणे, किरण गुळुंजकर,उत्तम घुले, विठ्ठल चौधरी, विजय चौधरी, कैलास चौधरी , दत्तात्रय हगवणे, गुलाब चौधरी, अर्जुन चौधरी, दत्तात्रय चौधरी, नितीन हगवणे, योगेश चौधरी, नवनाथ गायकवाड, महादेव चौधरी, सुरज चौधरी, काळूराम चौधरी, हभप यादव महाराज, तुषार चौधरी, बापू चौधरी, बाबुराव गायकवाड, शिवाजी चौधरी, नामदेव भोसले, अमोल खेडेकर, नंदकुमार चौधरी, राहुल चौधरी, सुनील हगवणे, भाऊसाहेब चौधरी, संजय चौधरी,गोरख चौधरी, किरण चौधरी, डॉक्टर हेमंत चौधरी,आप्पा माने, शैलेश चौधरी, शेखर हगवणे, सागर चौधरी, अमोल चौधरी, विशाल शेलार, राजेंद्र शेलार, सचिन शेलार, संजय कामठे, अविनाश चौधरी , आकाश चौधरी, जालिंदर कटके, संगीता चौधरी, माया चौधरी, कल्पना पवार, नंदा कुंभार, ग्रामपंचायत कर्मचारी, अंगणवाडी सेविका, मुख्याध्यापक संजय पवार व सर्व स्टाफ इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हभप रामचंद्र पवार यांनी केले व विकास चौधरी यांनी आभार मानले.
