किरण खुडे,

राजगुरुनगर : (हवेलीनामा प्रतिनिधी) : क्रिकेट हा केवळ खेळ नसून सर्व समाजांना विशेषतः तरूणांना जोडणारे एक प्रभावी माध्यम आहे. असे प्रतिपादन राजगुरुनगरचे नवनिर्वाचीत लोकनियुक्त प्रथम नगराध्यक्ष मंगेश गुंडाळ यांनी केले.

जैन प्रीमियर लीग, राजगुरुनगर यांच्या वतीने चांदूस (ता.खेड) येथे आयोजीत क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपिठावर सामाजीक कार्यकर्ते शुभम भनसाळी, रवि आवटे, डॉ. अमित ओसवाल उपस्थित होते.

पुढे बोलताना गुंडाळ म्हणाले, शहरातील जैन युवा कार्यकर्त्यांनी चांगले संघटन केले आहे. क्रिकेट सारख्या उपक्रमांमुळे तरुणांमध्ये नेतृत्वगुण, संघभावना आणि सामाजिक जबाबदारी विकसित होते, असे सांगुन त्यांनी खेळाडूंना शुभेच्छा देत समाजात सलोखा निर्माण करणाऱ्या अशा उपक्रमांना पाठिंबा देण्याचे आश्वासन यावेळी दिले.

‘वन रीजन, वन व्हिजन’ या संकल्पनेवर आधारित या स्पर्धेने जैन युवकांना एकत्र आणत सामाजिक एकतेचा सुंदर आदर्श निर्माण केला असून उद्योग व्यवसायानिमित्त वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत असलेले युवक क्रिकेटच्या माध्यमातून आपल्या मुळाशी नाते जोडताना यामुळे दिसून आले असल्याचे यावेळी बोलताना जैन प्रीमियर लीगचे समन्वयक अक्षय ओसवाल यांनी सांगितले.

स्पर्धेचे उद्घाटन नगराध्यक्ष मंगेश गुंडाळ यांनी फलंदाजी करून केले. मर्यादीत षटकांच्या या सामन्यात विजयी संघ व उत्कृष्ठ खेळाडूंना सन्मानीत करण्यात आले. स्नेहभोजन, मनोगत आदी उपक्रमांनी कार्यक्रमाची सांगता झाली.

कार्यक्रमाचे संयोजन ओसवाल, शहा, रुपडा, सोलंकी, भंडारी आदी जैन परिवारातील युवकांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *