पुणे (हवेलीनामा ऑनलाइन) सराफाच्या दुकानात आलेल्या ग्राहकांचे लक्ष विचलित करून सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारणाऱ्या टोळीला गजाआड करण्यात गुन्हे शाखेच्या युनिट ६ च्या पथकास यश आले असून याप्रकरणी चार जण अटकेत असून त्यांच्याकडून रु.२६ लाखाचा मुद्देमाल हस्तगत केला आहे
       पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  फसखाना पोलीस स्टेशन परिसरात घडलेल्या गुन्हयाचा तपास गुन्हे शाखा, युनिट ६ करत असताना पथकातील पोलीस नाईक रमेश मेमाणे यांना त्यांचे बातमीदारामार्फत माहिती मिळाली की,  हा गुन्हा बीड जिल्हयामधील आरोपींनी केला असून ते पारनेर, जिल्हा अहमदनगर येथे येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्याने याची माहिती गणेश माने, पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा, युनिट ६, पुणे शहर यांना दिली असता त्यांनी सदर ठिकाणी जावून संबंधिताना ताब्यात घेण्यासाठी सूचना केल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील यांनी पथकासह पारनेर, जि. अहमदनगर येथे जावून सापळा रचून त्यांनी १) सुरेखा ज्ञानेश्वर पवार, वय २९ वर्षे , रा. मु. रामगव्हाण, पो. नालेवाडी, ता. अंबड,जि. जालना, २) नंदा किशोर पवार, वय २६ वर्षे, रा. मु. पो. वडीगोद्री, ता. अंबड, जि. जालना, ३) ज्ञानेश्वर अंगद पवार, वय ३० वर्षे, रा. मु. रामगव्हाण, पो. नालेवाडी, ता. अंबड, जि. जालना, ४) किशोर शिवदास पवार, वय २७ वर्षे, रा. मु. पो. वडीगोद्री , ता. अंबड, जि. जालना यांना त्यांच्याकडील मोटारसह ताब्यात घेतले.
           यासर्व जणांना कार्यालयात आणून विश्वासात घेऊन दाखल गुन्हयाच्या संदर्भात तपास करता त्यांनी  गुन्हा केल्याचे कबूल केले.यावर त्यांना न्यायालयासमोर हजर करून त्यांची पोलीस कोठडी मिळवली व त्यात त्यांच्याकडून अंदाजे रु.
२२,५०,०००/-  किंमतीचे व एकूण ४९० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व गुन्हयामध्ये वापरलेली रु. ३,५०,००० / – किंमतीची टाटा झेस्ट मोटार असा एकूण रु. २६,००,०००/ –  किंमतीचा मुद्येमाल हस्तगत करण्यात आला आहे. या आरोपींवर जालना, बीड, नाशिक, अहमदनगर, पूणे अशा ठिकाणी  याप्रकारचे अनेक गुन्हे दाखल असून सराफा दुकानात ग्राहकांच्या नजरा चूकवून त्यांच्या बॅगमधून किंमती वस्तू, सोन्याचे दागिने चोरी करणे, अशी त्यांची गुन्हा करण्याची पद्धत आहे.
       सदरची उल्लेखनिय कारवाई ही अमिताभ गुप्ता  पोलीस आयुक्त,पुणे शहर,पोलीस सहआयुक्त,डॉ.रविंद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त,गुन्हे रामनाथ पोकळे, पोलीस उपआयुक्त,गुन्हे,श्रीनिवास घाडगे, सहा पोलीस आयुक्त, गुन्हे-२,लक्ष्मण बोराटे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा,युनिट-६ चे पोलीस निरीक्षक,गणेश माने, सहा. पोलीस निरीक्षक, नरेंद्र पाटील, पोलीस उपनिरीक्षक सुधीर टेंगले, अंमलदार मच्छिंद्र वाळके, विठ्ठल खेडकर, रमेश मेमाणे, कानिफनाथ कारखिले, नितीन शिंदे, नितीन मुंढे, बाळासाहेब सकटे, प्रतिक लाहिगुडे, ऋषीकेश ताकवणे, ऋषीकेश व्यवहारे, सचिन पवार, टिळेकर, शेखर काटे, नितीन धाडगे, सुहास तांबेकर व ज्योती काळे यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *