पुणे (हवेलीनामा ऑनलाइन) रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाच्या सदस्य पदी पत्रकार आणि लोककला क्षेत्रात कार्य करणारे खंडूराज गायकवाड याची नियुक्ती झाली.यासंदर्भात सांस्कृतिक कार्य विभागाने शासन निर्णय जारी केला आहे.
महाराष्ट्रातील लोककलावंतांच्या प्रश्नावर कार्य करणारे श्री गायकवाड यांनी तमाशा सम्राज्ञी कै विठाबाई नारायणगावकर यांच्या नावाने जीवन गौरव पुरस्कार सुरु करणे, लोककलावंतना आर्थिक पॅकेज मिळण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख यांच्या काळात खूप प्रयत्न केले होते.राज्यातील लोककला याचे सर्व्हेक्षण व्हावे म्हणून त्यांनी सन २०१० पासून तर आजमिती पर्यत प्रयत्न करीत आहे.
दिनांक १३ ऑक्टोबर २०२१ रोजीच्या शासन निर्णयानुसार एकूण पंधरा जणांची या मंडळावर सदस्य म्हणून नियुक्ती झाली आहे.
या निवडीनंतर महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष सिताराम लांडगे यांनी त्यांचे अभिनंदन केले व खंडूराज गायकवाड यांच्या सारख्या पत्रकारिता क्षेत्रातील व्यक्तीची ही योग्य निवड असल्याचे सांगितले त्यांच्याकडून कलावंतांना सरकारी योजनाचा जास्तीतजास्त फायदा मिळवून देण्याचा प्रयत्न ते करतील असा विश्वास व्यक्त केला.
