पुणे (हवेलीनामा वृत्तसमूह) पोलीस स्टेशनमध्ये अदखलपात्र गुन्हा नोंद असलेल्या गुन्ह्यामध्ये मदत करण्यासाठी तक्रारदार व त्याच्या वडीलास मदत करण्यासाठी पोलीस हवालदाराकडून सुरुवातीला तीन हजाराची मागणी व नंतर दहा हजाराची मागणी करण्यात आली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून पाच हजाराची लाच मागणी केल्याचे निष्पन्न झाल्यावर पोलीस हवालदार विरुद्ध सासवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार,सासवड पोलीस ठाण्यात कर्तव्यावर असलेले पोलीस हवालदार विकास लक्ष्मण ओमासे, वय 39 वर्षे यांच्यावर विरुद्ध ही कारवाई करण्यात आली.

थोडक्यात माहिती अशी की, तक्रारदार यांचा भाजीपाला विक्रीचा व्यवसाय आहे. तक्रारदार यांच्या व त्यांचे वडीलांच्या विरुध्द सासवड पोलीस स्टेशन येथे दाखल असलेल्या अदखलपात्र गुन्ह्यात कारवाई न करता त्यात मदत करण्याकरिता पोलीस हवालदार ओमासे यांनी तक्रारदाराकडे 3,000 रुपये लाचेची मागणी करत असल्याची तक्रार तक्रारदाराने दिनांक 24/12/2024 रोजी लाच लुचपत प्रतिबंधक विभाग येथे दिली होती.

प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने दि. 03/01/2026 रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे यांनी लाच मागणी पडताळणी कारवाई केली असता पडताळणी दरम्यान तक्रारदार व त्यांचे वडील यांच्याविरुद्ध दाखल असलेल्या तक्रारत तक्रारदार व त्यांचे वडिलांविरुद्ध कारवाई न करता त्यात मदत करण्याकरिता सुरवातीस 10 हजार लाच मागून तडजोडीअंती 5000 रुपयाची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले आहे. विकास लक्ष्मण ओमासे यांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध सासवड पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल केला आहे.

ही कारवाई पोलीस उप आयुक्त/पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, ला.प्र.वि. पुणे परिक्षेत्र, पुणे व अपर पोलीस अधीक्षक अजीत पाटील, ला.प्र.वि. पुणे, अपर पोलीस अधीक्षक अर्जुन भोसले, ला.प्र.वि. पुणे, यांचे मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *