पुणे (हवेलीनामा वृतसमूह) पुणे सोलापूर महामार्गावरील शेवाळेवाडी येथील “महावीर ज्वेलर्स” या सराफ दुकानात ४ ते ५ अनोळखी चोरट्यांनी धारदार शस्त्रांचा धाक दाखवुन काउंटरची काच फोडुन दुकानातील डीस्प्ले बोर्ड व कपाटातील एकुण ५२८.८ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागीने असा एकुण रु.५२,८८,०००/-रु. किं चा मुददेमाल धाडसी दरोडा टाकुन जबरीदस्तीने घेवुन गेले. यावर हडपसर पोलीस व युनिट पाच यांनी तत्परतेने तपास करून प्रथम तीन जणांनी द्राक्ष बागाय संघ पुणे सोलापूर रोड या ठिकाणाहून ताब्यात घेतले तर उर्वरित तिघे संभाजीनगर येथून ताब्यात घेण्यात आले.
दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक २ व युनिट ५ गुन्हे या शाखेचे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांचेसह सरकारी व खाजगी वाहनांनी मांजरी, लोणीकाळभोर, हडपसर पोलीस स्टेशन हददीत सीसीटीव्ही फुटेज, तांत्रीक विश्लेषण आधारे शोध घेत असताना दि.०४/०१/२०२६ रोजी १५/०० वा. द्राक्ष संशोधन केंद्राजवळ मांजरी बु” पुणे येथे ३ संशयीत ताब्यात घेतले. यात एक विधीसंघर्षीत बालक तसेच प्रविण महादेव शिंदे, वय १८ वर्षे, रा. कानीफनाथनगर हनुमान मंदीराजवळ गंगानगर फुरसुंगी व भावेश राजेश चव्हाण, वय २० वर्षे, रा.स. नं.१० उन्नतीनगर रविदर्शनजवळ हडपसर यांना अटक केल्यानंतर त्यांच्याकडे गुन्हयाचे अनुषंगाने तपास करता त्यांनी साथीदार ४) राजदीप संतोष जगताप, वय २१ वर्षे, रा.लोणीकाळभोर ता. हवेली इतर तीन विधीसंघर्षीत बालक ताब्यात यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली. युनिट ५ गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी अभिजीत पवार व पोलीस अंमलदार यांना तात्काळ रवाना केले असता तेथे दोन विधीसंघर्षीत बालक व राजदीप संतोष जगताप, रा. लोणीकाळभोर यांना ताब्यात घेतले. विधीसंघर्षीत बालक यांचेकडे गुन्हयातील गेले मालापैकी एकुण २२४.९२ ग्रॅम वजनाचे पिवळया धातुचे दागीने व १८३ ग्रॅम वजनाचे सिल्व्हर रंगाचे धातुचे दागीने मिळुन आले.
ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, पंकज देशमुख, पोलीस उप आयुक्त, गुन्हे, निखील पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे २ राजेंद्र मुळीक यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक छगन कापसे, सहा.पो.नि.सी.बी.बेरड, पो.उप.निरी. एस. जे. तानवडे, पोलीस अंमलदार राजेश लोखंडे, राजु पुणेकर, संतोष होले, परेश सावंत, राहुल इंगळे, संदीप येळे, विनायक येवले, विक्रांत सासवडकर, प्रफुल्ल मोरे सर्व नेमणुक दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक २. गुन्हे शाखा यांनी उघडकीस आणला आहे. तसेच नमुद कारवाईमध्ये पो.उप. निरी. अभिजीत पवार, अमित कांबळे, अकबर शेख, गणेश माने, राहुल ढमढेरे सर्व नेमणुक युनिट ५. गुन्हे शाखा पोलीस अंमलदार जहाँगीर पठाण, किशोर दुशिंग, सुमाष आव्हाड, विशाल इथापे सर्व नेमणुक युनिट ४ गुन्हे, सहा.पो.नि. मदन कांबळे, पोलीस अंमलदार कानीफनाथ कारखेले, ऋषिकेश व्यवहारे, ऋषिकेश ताकवले सर्व नेमणुक युनिट ६. गुन्हे शाखा पुणे शहर यांनी केली.
