थेऊर,(हवेलीनामा वृतसमूह ) पर्यावरण संवर्धन व हरित भारताच्या संकल्पनेतून म्हातारिमाता मंदिर, थेऊर येथे वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. उद्यानविद्या जागरूकता व औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत उद्यानविद्या महाविद्यालय, पुणे येथील उद्यानविद्या कन्यांनी या उपक्रमाचे आयोजन केले.

कार्यक्रमादरम्यान मंदिर परिसरात शोभिवंत वनस्पती तसेच लागवडीस उपयुक्त पिकांची लागवड करण्यात आली. विद्यार्थिनींनी वृक्षांचे पर्यावरणातील महत्त्व, वाढते प्रदूषण व पाणीटंचाईवर उपाय म्हणून वृक्षलागवडीची गरज याविषयी उपस्थित शेतकरी व ग्रामस्थांना मार्गदर्शन केले. “झाडे लावा, झाडे जगवा” हा संदेश देत पर्यावरण संरक्षणासाठी सामूहिक प्रयत्नांची आवश्यकता अधोरेखित करण्यात आली.

वृक्षारोपणाची संपूर्ण जबाबदारी उद्यानविद्या कन्यांनी स्वतः पार पाडली. कार्यक्रमास उपस्थित शेतकरी व ग्रामस्थांनी या उपक्रमाचे मनापासून स्वागत करून विद्यार्थिनींच्या कार्याचे कौतुक केले.

या कार्यक्रमाचे आयोजन सलोनी माने, सीमा मुंढे, ऋतुजा नाखले, नम्रता नाळे, ऋतुजा नामदास, प्रगती परभत, सानिका पाटील, हर्षदा शिंदे, प्रियंका शिंदे, आर्या सूर्यवंशी व वैष्णवी वंजारी यांनी केले.

या उपक्रमासाठी कृषी महाविद्यालय, पुणे येथील सहयोगी अधिष्ठाता डॉ. महानंद माने, सहयोगी संशोधन संचालक गणेशखिंड, पुणे तथा केंद्रप्रमुख डॉ. सुभाष भालेकर, उद्यानविद्या महाविद्यालय, पुणे तथा मृदाशास्त्र विषयाचे सहाय्यक प्राध्यापक व कार्यक्रम अधिकारी डॉ. श्रद्धा वाबळे आणि डॉ. सुनील जोगदंड यांचे मार्गदर्शन लाभले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *