किरण खुडे

राजगुरुनगर : (हवेलीनामा प्रतिनिधी) : खेड तालुक्याच्या पुर्व भागातील वाकळवाडी, ठाकरवाडी परिसरातून एक शाळकरी मुलगी बेपत्ता झाल्याची घटना घडली. इयत्ता ८ वी मध्ये शिक्षण घेत असलेली वंदना वसंत इंगळे असे बेपत्ता झालेल्या विद्यार्थीनीचे नाव आहे.

याप्रकरणी खेड पोलीसांत तक्रार देण्यात आली असून पोलीस तीचा शोध घेत आहेत. रंगाने गहुवर्ण, अंगाने सडपातळ, चेहरा उभट, उंची सुमारे ५ फूट, नाक सरळ, केस लांब आहे. तीने हिरव्या रंगाची साडी व हिरव्या रंगाचा ब्लाऊज परिधान केलेली असून मराठी भाषा बोलते. अशा वर्णनाची मुलगी आहे. या मुलीबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास किंवा ती कुठे आढळून आल्यास तात्काळ खेड पोलीस स्टेशन दूरध्वनी क्रमांक ०२१३५-२२२०३३ वर संपर्क साधावा, असे आवाहन खेड पोलिसांकडून करण्यात आले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *