थेऊर (हवेलीनामा ऑनलाइन) गेली नऊ दिवस चालू असलेल्या नवरात्र उत्सवाची आज सीमोल्लंघनाने सांगता झाली यात आबालवृद्ध तरुण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. थेऊरच्या दसऱ्यास ऐतिहासिक परंपरा लाभली असून अष्टविनायकांपैकी एक असलेल्या श्री चिंतामणी गणपतीची उत्सवमूर्ती पालखीतून सीमोल्लंघनासाठी निघते.

          गेल्या वर्षी कोरोना महामारीच्या संकटामुळे सर्वच सणांवर मर्यादा आल्या अनेक सण उत्सव रद्द करण्यात आले त्यामुळे हा दसरा होऊ शकला नाही यावर्षी कोरोना संक्रमणाचा दर खाली आल्याने व प्रतिबंधात्मक लसीकरण झाल्याने जवळपास सर्व अस्थापने चालू झाली नुकतीच मंदिरे दर्शनासाठी खुली करण्यात आली.
          नवरात्र उत्सव चालू झाल्यानंतर गेली नऊ दिवस थेऊर येथील ग्रामदैवत श्री म्हातारीआई व तुळजाभवानी मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले.दसऱ्याच्या दिवशी श्री चिंतामणी गणपती पालखीतून सीमोल्लंघन करण्यासाठी वाजतगाजत निघतात यासाठी थेऊर येथील आगलावे बंधू याचा भारत बँड हे याचे खास आकर्षण असते.ही पालखी देवालयाचे पुजारी आगलावे बंधू यात संकेत आगलावे, मुकुंद आगलावे,सुधीर आगलावे, चेतन आगलावे यांनी सारथ्य केले. या सोहळ्याला गावातील जेष्ठ मंडळी उपस्थित असते गावातून पालखी सोहळा जातो तेंव्हा जागोजागी रांगोळ्या, फुलांच्या पायघड्या घालुन सोहळ्याचे स्वागत करण्यात आले.यावेळी महाराष्ट्र राज्य साखर कामगार समन्वय सामितीचे अध्यक्ष तात्यासाहेब काळे,हवेली पंचायत माजी सदस्य हिरामण काकडे, काळूराम कांबळे,थेऊरचे माजी उपसरपंच विलास कुंजीर, शहाजी जाधव, ग्रामपंचायत सदस्य विठ्ठल काळे,युवराज काकडे,राहुल कांबळे,मोरेश्वर पेंडसे, माजी सदस्य काशिनाथ कोळेकर,संजय कुंजीर,रामकृष्ण पतसंस्थेचे संचालक गंगाराम कुंजीर,प्रकाश पायगुडे,तुकाराम तारु, गौतम काकडे,शरद काकडे,सुखराज कुंजीर,गणेश रसाळ, गणेश कांबळे,कृषिनिष्ठ शेतकरी विजय कुंजीर रामकृष्ण पतसंस्थेचे सचिव दत्ताञय तांबे,एकनाथ काळे, रमेश कुंजीर,दत्ताञय कुंजीर,आण्णासाहेब बोडके,गोरख काळे,रमेश काळे, राजेंद्र सोनवणे,पंढरीनाथ कुंजीर,बाळासाहेब शेडगे, चंद्रकांत तारु,लक्ष्मण चव्हाण,दत्ता पडळकर,बाजीराव कुंजीर,कैलास ढवळे,विनोद कांबळे,विलास सोनवणे,हिम्मत काकडे,बबन रंधवे,उघोजक अमोल काळे,गणेश काळे,सुमित कुंजीर,मारुती राऊत,प्रकाश आळंदे,सचिन काकडे उपस्थित होते
             यावेळी लोणी काळभोरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांच्या सूचनेनुसार थेऊर पोलीस चौकीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीशैल्य चिवडशेट्टी यांचा मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार विजय जाधव व शिंदे यांनी परिस्थिवर लक्ष ठेवून होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *