पुणे (हवेलीनामा वृतसमूह) पुणे जिल्ह्यातील कोरेगाव भीमा या ठिकाणी असलेल्या शौर्यस्तंबास राज्याच्या सह संपूर्ण देशातील भीम अनुयायी लाखोंच्या संख्येने अभिवादन करण्यासाठी आले असून त्यांच्या सोयीसाठी राज्य शासनाने मोठ्या प्रमाणात सुविधा उपलब्ध करून दिले आहे त्यामुळे भीम अनुयायांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.

राज्याच्या वेगवेगळ्या जिल्ह्यातून येणारे भीम अनुयायी पुणे जिल्ह्यातील भीमा कोरेगाव या ठिकाणी असलेल्या विजयस्तंभ अभिवादन करण्यासाठी दरवर्षी एक जानेवारी रोजी येत असतात यासाठी शासकीय पातळीवर महसूल आणि गृह खात्याकडून उपाययोजना केली जाते मोठ्या प्रमाणात पोलीस बस बंदोबस्त त्याचप्रमाणे शासकीय अधिकाऱ्यांची एक टीम कार्यरत असते त्यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल खात्याचे वेगवेगळे कर्मचारी वेगवेगळ्या ठिकाणी सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कार्यरत असतात तसेच पुणे परिवहन महामंडळाकडून विजय स्तंभ जवळ जाण्यासाठी वाहतूक व्यवस्था करण्यात आलेली आहे त्यामुळे गर्दीचे प्रमाण आटोक्यात आले आहे वेगवेगळ्या राज्यातून आलेले भीम अनुयायी आपापली वाहने वाहन तळावर लावून पुढे शासकीय वाहनांमधून विजयस्तंभ पर्यंत पोहोचतात.

सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली तसेच पुणे जिल्ह्याच्या दक्षिण व पश्चिम पट्ट्यातील भीम अनुयायी पुणे सोलापूर महामार्गाने थेऊर मार्गे लोणीकंद पर्यंत पोहोचतात या मार्गामध्ये पुणे सोलापूर महामार्गावर थेऊर फाटा या ठिकाणी लोणी काळभोर येथील सिद्धार्थ तरुण मंडळ यांच्या वतीने अल्पोपहार व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती सोलापूर सांगली कोल्हापूर या परिसरातून आलेल्या भीम अनुयायांनी या ठिकाणी विश्रांती घेऊन पुढील प्रवास केला.
थेऊर येथे श्री चिंतामणी विद्या मंदिर शेजारी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे हवेली तालुका अध्यक्ष मारुती कांबळे यांनी भीम अनुयायांसाठी भोजन व्यवस्था केली होती याला चांगला प्रतिसाद मिळाला असून शेकडो भीम अनुयायांनी याचा लाभ घेतला यावेळी मारुती दादा तरुण मंडळाचे सर्व सदस्य या सेवेमध्ये कार्यरत होते.
