थेऊर (हवेलीनामा वृतसमूह) पूर्व हवेलीतील ग्रामीण भागांमध्ये अग्रगण्य असलेल्या पतसंस्थांमध्ये एक अग्रगण्य पतसंस्था म्हणून नावारूपाला असलेली श्री क्षेत्र थेऊर येथील रामकृष्णाहरी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या मुख्य शाखेचा २५ वा रोप्य मोहोत्सवी वर्धापनदिन पार पडला.यावेळी संस्थेने काढलेल्या दिनदर्शिकेचे संस्थेचे अध्यक्ष तात्यासाहेब रामचंद्र काळे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले यावेळी उपाध्यक्ष विजय एकनाथ कुंजीर,सचिव ऋतिक विठ्ठल काळे,मुख्य व्यवस्थापक विजय पंढरीनाथ काळे, संचालक रमेश साहेबराव कुंजीर, वैभव हरिश्चंद्र बडदे, बाळासाहेब गणपत शिर्के, सुरेश रोहिदास चव्हाण, शहाजी राजाराम जाधव, तानाजी सदाशिव तारु, दिलीप दत्तात्रय लगड, काशिनाथ विठ्ठल कोळेकर, विलास किसन कुंजीर, दत्तात्रय आण्णासो तांबे,सौ. नंदा यशवंत कुंजीर,सौ. संगिता एकनाथ काळे तसेच संस्थेचे कर्मचारी रामदास वाईकर ,राजू जाधव ,मुकुंदा गुळुंजकर,देविदास घुगे आणि सन्माननीय उपस्थित होते.
संस्थेचा कारभार करत असताना सन्माननीय ग्राहक, खातेदार यांनी संस्थेच्या कामकाजात केलेल्या सहकार्यामुळे संस्था प्रगतीची वाटचाल करित आहे. आपली संस्था ग्राहकांना RTGS, NEFT चेक क्लेअरिंग, त्वरीत सोनेतारण कर्ज, इ. सुविधा राबवत आहे. कर्जदाराची गैरसोय होणार नाही यासाठी ऑनलाईन पद्धतीने हफ्ता घेण्याची सुविधा सुरु केली आहे.
समाजातील घटकांचा आर्थिक विकास व्हावा हे लक्षात घेऊन संस्थेने शैक्षणिक, सामाजिक व धार्मिक क्षेत्रातही आपला सहभाग ठेवला आहे. संस्था अखंड हरिनाम सप्ताह, संत तुकाराम पालखी सोहळा, आषाढी एकादशी या सारख्याधार्मिक कार्यात आपले मोलाचे योगदान देते. तसेच शालेय विद्यार्थ्यांचा गुणगौरव करुन त्यांच्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी पुरस्कृत करते व त्यांना आर्थिक स्वरुपाची मदत करते. संस्था नियमित कर्जफेड करणाऱ्या कर्जदारांचा तसेच ठेवीदारांचा सत्कार करुन त्यांना सन्मानित करते.
एक जानेवारी हा संस्थेचा वर्धापन दिन असतो गेल्या 25 वर्षांपूर्वी लावलेल्या हे रोपट आता वटवृक्षात रूपांतर झाले असून ग्राहकांच्या अडचणीत सहकार्य करून त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत असते सध्या शाखेच्या एकूण तीन शाखा असून मुख्य शाखा थेऊर, दुसरी शाखा वाघोली व तिसरी शाखा कुंजीरवाडी या ठिकाणी कार्यरत आहे दैनंदिन ठेवी बरोबरच फिक्स डिपॉझिट ठेवी सुद्धा मोठ्या प्रमाणात संस्थेकडे आहेत ग्राहकांच्या विश्वासात उतरल्याने मोठ्या प्रमाणात ग्राहकांनी आपल्या ठेवी संस्थेमध्ये जमा केलेले आहेत पारदर्शक कारभारामुळे संचालक मंडळांचेही चांगले सहकार्य मिळत आहे असे संस्थेचे अध्यक्ष तात्यासाहेब काळे यांनी सांगितले.
