अतुल देशपांडे,

सातारा (हवेलीनामा प्रतिनिधी)  म्हसवड पोलिसांचा पक्षपाती कारभार सुरु आहे. त्या विरोधात निवेदने दिल्यानंतरही कारवाई होत नसल्याने मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्यामोर बोंबाबोंब आंदोलन करणार असल्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते महेश करचे यांनी दिला.सातारा येथील पत्रकार परिषदेत बोलताना महेश करचे म्हणाले, म्हसवडचे सपोनि अक्षय सोनवणे यांच्या कारभारामुळे नागरिक भयभीत आहेत. नुकत्याच झालेल्यानिवडणुका पारदर्शीपणे झाल्या नाहीत. पोलिस अधिकारी राजकीय हेतून प्रेरीत होवून काम करत आहेत.

राजकीय पक्षाच्या मंचावर अक्षय सोनवणे हे सत्कार समारंभ घेत असल्याचा फोटो व्हायरल होत आहे. आवाज उठवणाऱ्यांना सर्वसमान्यांना तसेच विरोधी पक्षातील कार्यकर्त्यांना म्हसवड पोलिस नाहक त्रास देत आहेत.

याबाबतच्या सर्व तक्रारी पोलिस अधीक्षक तुषार दोशी तसेच अन्यत्र केल्या आहेत. मात्र अद्याप त्यांच्याकडून दखल घेतली नाही.यामुळेच मुख्यमंत्री यांचा दि. २ जानेवारी रोजी सातारा जिल्ह्यात दौरा आहे.येथील माण-खटाव कारभाराबाबत माहिती देण्यासाठी मुख्यमंत्री यांची वेळ मागितली आहे. मुख्यमंत्री यांची वेळ न मिळाल्यास व पोलिस अधिकाऱ्यावर कारवाई न झाल्यास मुख्यमंत्र्यासमोर जिथे संधी मिळेल तिथे त्यांच्यासमोर बोंबाबोंब आंदोलन करणार असल्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते महेश करचे, डॉ. प्रसाद ओंबासे, बाळराजे विरकर यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *