दिपक खिलारे,

  1. इंदापूर (हवेलीनामा प्रतिनिधी)

प्रभाग क्रमांक दोन मध्ये श्रीराम सोसायटी श्रीनाथ सोसायटी व महात्मा फुले नगर येथील लोकांचे रस्त्याचे वारंवार मागणी चौगुले व नलवडे यांच्याकडे केली जात होती त्याचा कृषिमंत्री भरणे व नगराध्यक्ष भरत शहा यांच्याकडे पाठपुरावा केल्यामुळे प्रत्यक्षात निधी देऊन रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली व प्रभागातील लोकांची रस्त्याची गैरसोयी दूर झाल्याबद्दल प्रभागातील सर्व लोकांनी भरणे शहा चौगुले व नलवडे यांचे आभार मानले.

प्रभाग क्रमांक २ मधील ड्रेनेज लाईन मुळे खराब झालेल्या रस्त्याचे शहा कार्यालय ते श्रीनाथ सोसायटीपर्यंत डांबरी रस्त्याचे काम चालू करण्यात आले. रस्त्यामुळे श्रीराम सोसायटी, श्रीनाथ सोसायटी, महात्मा फुले नगर मधील मध्ये रस्ते, पेव्हर ब्लॉक च्या कामास प्रत्यक्ष सुरुवात झाली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजित पवार,नामदार कृषीमंत्री दत्तात्रय भरणे, नुतन नगराध्यक्ष भरत शहा यांच्या माध्यमातून विकासकामे सुरु करण्यात आली.

प्रभागाच्या विकास कामांकरिता उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषीमंत्री दत्तात्रय भरणे, नगराध्यक्ष भरत शहा यांच्या माध्यमातून निधी कमी पडू देणार नाही असे माजी नगरसेवक राजेंद्र चौगुले यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *