थेऊर – (हवेलीनामा वृत्तसेवा) हवेलीतील सहाही जिल्हा परिषद गटात सध्या कडाक्याच्या थंडीतही वातावरणात तापू लागले असून घोंगडी बैठकासह शेकोटी बैठकांना जोर आला आहे गावोगावी शेकोटी चर्चा जोरात सुरू आहे त्यातच अनेक ठिकाणी तोडीसतोड उमेदवारांचे एकामेकांसमोर कडवे आव्हान उभे राहिले आहे त्यामुळे अनेक जिल्हा परिषद गटात चुरस निर्माण झाली असली तरी अनेक राजकीय पक्षांनी आपली भूमिका गुलदस्त्यातच ठेवली आहे युती आणि आघाडीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत बिघाडी होण्याची शक्यता आहे. दुसऱ्या टप्प्यातील महानगरपालिका निवडणुकीदरम्यान राजकीय पक्षांमध्ये मोठी उलथापालक झाल्याचे दिसून येत असून सर्वच राजकीय पक्षांना बंडखोरीचे ग्रहण लागल्याचे दिसून येत आहे त्यामुळे तिसऱ्या टप्प्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीदरम्यान काय चित्र समोर येते याकडे मतदारांचे लक्ष लागून आहे.
पूर्व हवेलीतील विशेषतः थेऊर आव्हाळवाडी जिल्हा परिषद गटातील दोन्ही पंचायत समिती गणात सद्यस्थितीत जोरदार रस्सीखेच चालू असल्याचे दिसून येत आहे. आमदार माऊली कटके यांनी हवेली तालुक्यातील जिल्हापरिषद आणि पंचायत समितीचे केसनंद कोरेगाव गटातील तिकीट जाहीर करुन आघाडी घेतली आहे संपूर्ण हवेली तालुक्याचे लक्ष जिल्हा परिषदेच्या गट क्रमांक ४०कडे लागून राहिले आहे त्यात आमदार कटकेची भूमिका अजूनही गुलदस्त्यातच आहे या गटात निष्ठावंत कार्यकर्त्यांला संधी देणार का याकडे तालुक्यातील अनेक दिग्गज नेते मंडळीचे लक्ष लागून राहिले आहे निवडणूक सुरु होण्यापूर्वीच काहीशी एकतर्फी वाटणारी निवडणूक आता मात्र चुरशीची होणार हे स्पष्ट झाले आहे या गटात आव्हाळवाडी येथील माजी उपसरपंच संदेश आव्हाळे यांनी तगडी बिल्डिंग लावून अयोध्या काशी यात्रा मतदारांसाठी घडवून आणून तगडे आव्हान उभे केले होते सुरुवातीला एकतर्फी वाटणारी निवडणूक संदेश आव्हाळे यांनी उभे केलेले तगडे आव्हान कोण उभे करणार याकडे मतदारांचे लक्ष लागून राहिले होते त्यातच आमदार माऊली कटके यांचे विश्वासू सहकारी व कट्टर समर्थक राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस प्रकाश सावंत यांनी आपल्या पत्नीची उमेदवारी जाहीर करून मतदार संघातील मतदारांना उज्जैन महाकालची दर्शन यात्रा काढून कडवे आव्हान उभे केले तसेच प्रत्येक गावातील नागरिकांसाठी आरोग्य शिबिरे आयोजित केली त्याला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला तर दुसरीकडे थेऊर मधील ग्रामपंचायत सदस्य आरोग्य दूत युवराज काकडे यांनी आपल्या पत्नीला निवडणूकीचा रिंगणात उतरवले असून शिंदे सेनेच्या माध्यमातून गेल्या तीन वर्षांत केलेल्या विकासकामांच्या जोरावर व गावोगावी आरोग्य शिबिरे आयोजित करून आव्हान उभे केले आहे त्यामुळे थेऊर जिल्हा परिषद गटात सध्या तरी तिरंगी सामना होणार असून आमदार माऊली कटके नेमके निष्ठावंत कार्यकर्त्यांला संधी देणार की धक्कादायक निर्णय घेणार यावर बरेच अवलंबून आहे जिल्हा परिषद गटात माऊली कटके यांचे कट्टर समर्थक मांजरी गावचे माजी उपसरपंच प्रकाश सावंत यांची पत्नी सिमा सावंत यांना उमेदवारी मिळावी यासाठी आग्रही आहेत त्यांनी पंचायत समितीच्या आव्हाळवाडी गणासाठी पुनम अशोक गायकवाड व थेऊर पंचायत समितीच्या गणासाठी हवेली पंचायत समितीचे माजी सभापती चंद्रभागा सयाजी काकडे यांचे पुतणे योगेश काकडे असे उमदेवार आहेत
तर दुसरीकडे संदेश आव्हाळे यांची पत्नी कोमल आव्हाळे जिल्हा परिषद सदस्य पदासाठी तर पंचायत समितीच्या आव्हाळवाडी गणासाठी संतोष मुरकुटे यांची पत्नी सुनिता मुरकुटे व थेऊर गणासाठी कुंजीर वाडीचे माजी सरपंच सचिन तुपे यांचा मुलगा सिध्दांत तुपे यांनी एकत्रितपणे तयारी सुरू केली आहे तर थेऊर येथील पंचायत समितीचे माजी सदस्य हिरामण काकडे यांची सून व ग्रामपंचायत सदस्य युवराज काकडे यांची पत्नी पल्लवी काकडे यांनी जिल्हा परिषद गटात आपली उमदेवारी जाहीर करून प्रचारास सुरूवात केली आहे पंचायत समिती थेऊर गणात सोरतापवाडी गावचे माजी सरपंच सागर चौधरी यांचे भाच्चे कुंजीर वाडीचे ग्रामपंचायत सदस्य संग्राम कोतवाल यांनी पंचायत समिती साठी तयारी करुन प्रचारास सुरूवात केली आहे तर आव्हाळवाडी गणात मांजरीचे स्वप्निल उंद्रे यांच्या पत्नीची भूमिका अजूनही गुलदस्त्यातच आहे त्यामुळे थेऊर जिल्हा परिषद गटात सध्या तरी तिरंगी लढत होणार असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे यात राष्ट्रवादी काँग्रेसचे तिकीट कुणाला मिळणार यावर पुढील समीकरणे अवलंबून आहे ज्या उमेदवाराला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तिकीट मिळणार त्याची बाजू भक्कम राहणार असा कायास बांधला जात असून राष्ट्रवादी ला पोषक असणार हा मतदारसंघ आहे त्यामुळे तिकीटासाठी मोठी चुरस निर्माण झाली असून पक्षाशी एकनिष्ठ राहणाऱ्या कार्यकर्त्यांला संधी कटके देणार का याकडे मतदार संघातील नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे आमदार कटकेची भूमिका गुलदस्त्यातच असल्याने उमेदवारांचे समर्थक मात्र आम्हालाच तिकीट मिळणार असे छातीठोकपणे सांगत आहे. परंतु पक्ष निष्ठावंतांना डावलून आयारामाना संधी देणार का याकडे लक्ष लागून राहिले आहे.
