थेऊर (हवेलीनामा वृतसमूह) श्री संत तुकाराम शिक्षण संस्था, चंदननगर यांच्या मार्गदर्शनाखाली अनुसया तुकाराम पठारे कला, वाणिज्य व विज्ञान वरिष्ठ महाविद्यालय, वाडेबोल्हाई येथे पंढरीनाथ पठारे यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यस्तरीय अंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेस राज्यातील विविध महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

स्पर्धेच्या उद्घाटन समारंभात जोगेश्वरी माता माध्यमिक विद्यालयाचे शाळा व व्यवस्थापन समिती सदस्य कुशाभाऊ गावडे यांनी आपल्या मनोगतात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणे व संवादकौशल्य विकसित करणे यासाठी अशा वक्तृत्व स्पर्धा अत्यंत उपयुक्त असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांनी वाचन, श्रवण व प्रभावी सादरीकरण ही कौशल्ये आत्मसात करणे काळाची गरज असून ग्रामीण भागात अशा स्पर्धांचे आयोजन केल्याबद्दल त्यांनी महाविद्यालयाचे विशेष अभिनंदन केले. मूल्यात्मक शिक्षणाच्या माध्यमातून वैयक्तिक जीवनात स्वतःचा सर्वांगीण विकास साधणे आवश्यक असून प्राध्यापक–विद्यार्थी नाते अधिक सुदृढ केल्यास विद्यार्थ्यांच्या मनातील अभ्यासाविषयीची भीती दूर होते, असेही त्यांनी नमूद केले.

या वक्तृत्व स्पर्धेत प्रथम पारितोषिक गडहिंग्लज (जि. कोल्हापूर) येथील शिवराज महाविद्यालयाचा विद्यार्थी संकेत कृष्णात पाटील याने पटकावले. त्यास सविता श्रीकांत गावडे यांच्यावतीने रु. 7000/- रोख, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.

द्वितीय पारितोषिक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागातील विद्यार्थिनी सुकन्या देऊकर हिला कुशाभाऊ गावडे यांच्या वतीने रु. 5000/- रोख बक्षीस प्रदान करण्यात आले.

तृतीय पारितोषिक कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थिनी समृद्धी संतोष मुंगसे हिला संध्या योगेश गावडे यांच्या वतीने रु. 3000/- रोख बक्षीस प्रदान करण्यात आले.

उत्तेजनार्थ पारितोषिके रु. 1000/- चे पारितोषिक वेदांत संतराम होळकर (के. के. वाघ महाविद्यालय, पिंपळगाव, नाशिक)

आणि प्रज्ञा शिवाजी पंडागळे (सी. के. गोयल महाविद्यालय, दापोडी) यांना देण्यात आले. या पारितोषिकांचे प्रायोजक विद्याधर गावडे (अध्यक्ष, शाळा समिती) होते.

फिरता करंडक सी. के. गोयल महाविद्यालय, दापोडी येथील विद्यार्थिनी अनुष्का भिंगरदिवे व प्रज्ञा पंडागळे यांनी पटकावला.

या स्पर्धांसाठी परीक्षक म्हणून सी. के. गोयल कला व वाणिज्य महाविद्यालयाचे प्रा. किशोर मुठेकर तसेच राजगुरुनगर येथील ‘पुस्तक मैत्री बुक गॅलरी’च्या संचालिका प्रा. मयुरी भवारी यांनी काम पहिले.

याच समारंभात श्री पंढरीनाथ पठारे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या निबंध लेखन, सुंदर हस्ताक्षर व भित्तिपत्रक स्पर्धांतील बक्षीसपात्र विद्यार्थ्यांना देखील मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली.

या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी अण्णासाहेब पठारे (अध्यक्ष, श्री संत तुकाराम शिक्षण संस्था), बापूसाहेब पठारे (सचिव), कांतीलाल उमाप (उपाध्यक्ष, विकास प्रतिष्ठान), राजेंद्र उमाप (सचिव, विकास प्रतिष्ठान) यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

कार्यक्रमास महेंद्र पठारे (मा. नगरसेवक, पुणे मनपा), रविंद्र पठारे, सुरेंद्र पठारे, लता गायकवाड, वैभव पठारे, विद्याधर गावडे, अॅड. दत्तात्रय काळे यांच्यासह विविध शिक्षणसंस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रभारी प्राचार्य डॉ. उमा काळे (अनुसया तुकाराम पठारे महाविद्यालय, वाडेबोल्हाई), डॉ. जगदीश आवटे (विकास प्रतिष्ठान, चंदननगर), प्राचार्य सतीश धुमाळ, मुख्याध्यापक संदीप सुरेश गावडे, कलावती ढेरंगे, दिलीप राजाराम शिंदे तसेच महाविद्यालयातील प्रा. शरद सवाईसर्जे, प्रा. सोनाली उनउने, प्रा. ऋषिकेश इथापे, प्रा. महेंद्र चित्ते, प्रा. गणेश फलके, प्रा. पल्लवी गायकवाड,प्रा. रेखा पठारे,प्रा. ज्ञानेश्वर मेंगडे, प्रा.राजेंद्र राऊत, प्रा. सूर्यकांत क्षीरसागर, या सर्व प्राध्यापकवृंदांचे मोलाचे सहकार्य लाभले.तर सेवक सहकरी कर्मचारी राजेंद्र ढगे, विशाल रंधवे, दीपक बंडलकर. यांचे सहकार्य महत्त्वपूर्ण ठरले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. कोमल गायकवाड यांनी केले, तर आभारप्रदर्शन प्रभारी प्राचार्य डॉ. उमा काळे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *