पुणे (हवेलीनामा वृतसमूह) पुणे जिल्हा भूसंपादन कार्यालयात सेवानिवृत्त मंडलाधिकारी कंत्राटी कामावर असताना आपल्यासाठी वा वरिष्ठांसाठी एक लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी त्यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहिती नुसार, श्रीमती सुनंदा अशोक वागसकर/येवले, वय 61 वर्षे, पद सेवानिवृत्त मंडळ अधिकारी, सध्या उपजिल्हाधिकारी भूसंपादन कार्यालयात कंत्राटी तत्त्वावर काम रा.ठी.सर्वे नंबर 37, केशव नगर, मुंढवा पुणे.यांनी सुरुवातीला रु.50,000/- (पन्नास हजार रूपये फक्त) लाच मागितली तर पडताळणीत 1,00,000/- (एक लाख रूपये फक्त) स्वतः साठी तसेच उपजिल्हाधिकारी सिद्धार्थ भंडारे यांच्यासाठी लाच मागितल्याची तक्रार करण्यात आली होती.

थोडक्यात माहिती अशी की,तक्रारदार हे शेतकरी असून त्यांची 62 वर्षाची मामे बहीणीच्या वडिलोपार्जित जमिनीचे झालेल्या वाटपपत्राच्या नोंदीची केस उपजिल्हाधिकारी सिद्धार्थ भंडारे भूसंपादन विभाग पुणे यांच्याकडे चालू आहे. यातील लोकसेविका श्रीमती सुनंदा वागसकर या श्री भंडारे यांच्या कार्यालयात नोकरीस आहेत, केसची सुनावणी पूर्ण झाली असून त्या केसच्या निकालाची प्रत देण्यासाठी श्रीमती वागसकर येवले व सिद्धार्थ भंडारे, उपजिल्हाधिकारी भूसंपादन क्र.26 जिल्हाधिकारी कार्यालय पुणे यांनी तक्रारदाराकडे पन्नास हजार रुपयाची लाच मागितल्याची तक्रार तक्रारदार यांनी दि. 28/10/2025 रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे येथे दिली होती.

पडताळणी दरम्यान सुनावणी पूर्ण झालेल्या केसच्या निकालाची प्रत तक्रारदारांना देण्यासाठी स्वतः करीता व उप जिल्हाधिकारी श्री सिद्धार्थ भंडारे यांच्याकरीता 1,00,000/- (एक लाख) रूपयांची लाच मागणी करून स्विकारण्याची तयारी दर्शविल्याचे निष्पन्न झाले त्यानंतर सुनंदा अशोक वागसकर येवले यांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध बंडगार्डन पोलीस ठाणे, येथे गुन्हा दाखल केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *