थेऊर (हवेलीनामा वृत्तसमूह ) अष्टविनायकांपैकी एक तीर्थक्षेत्र असलेल्या श्रीक्षेत्र थेऊर चिंतामणी गणपती दर्शनासाठी राज्याच्या विविध भागातून भाविकांची मोठी गर्दी होत असते यासाठी अनेक भाविक वेगवेगळ्या वाहनांतून थेऊर गावी पोहोचतात पुणे सोलापूर महामार्गावरून थेऊर गावात येत असताना मार्गात अनेक वेळेला वाहतूक कोंडी होत असल्याने भाविकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो तसेच लोणीकंद येथून थेऊर कडे येत असताना या रस्त्यावर अनेक वेळा वाहतूक कोंडी ही नित्याचीच होऊन बसलेली आहे.

सध्या नाताळाच्या सुट्ट्या असल्याने संपूर्ण राज्यातील भाविक वेगवेगळ्या पर्यटन स्थळांना भेटी देत आहेत त्यामुळे अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे पर्यटन स्थळांबरोबरच धार्मिक पर्यटनाकडे सुद्धा अनेक भाविक वळलेले असल्याने राज्यातील विविध धार्मिक स्थळांमध्ये सध्या प्रचंड गर्दी अनुभवास येत आहे पुणे शहरालगत असलेल्या तीर्थक्षेत्र थेऊर या ठिकाणी श्री चिंतामणी गणपती दर्शनासाठी भाविक मोठ्या प्रमाणामध्ये येत आहेत परंतु या भाविकांना थेऊर गावांमध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे यावर वाहतूक विभागाने त्वरित आणि कायमस्वरूपी वाहतूक कोंडी होणार नाही याची व्यवस्था करावी अशी स्थानिक नागरिकासहभाविकांची मागणी आहे.

श्री क्षेत्र थेऊर हे लोणी काळभोर पोलिस स्टेशन अंतर्गत येत असल्याने मागील काही वर्षात हे पोलीस स्टेशन शहरायुक्तालयास जोडल्यानंतर या ठिकाणी वाहतूक पोलीस नियुक्ती करण्यात यावी अशा प्रकारच्या अनेक बातम्या प्रकाशित होऊन देखील याकडे वाहतूक विभागाने गांभीर्याने लक्ष दिल्याचे दिसून येत नाही या ठिकाणी आठवडी बाजार चतुर्थी या दिवशी मोठी वाहतूक कोंडी होते तसेच शनिवार रविवार या आठवड्यातील सुट्ट्यांच्या दिवशी देखील मोठी गर्दी अनुभवास येते त्यामुळे ही वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी कायमस्वरूपी वाहतूक पोलीस नियुक्ती करण्यात यावी अशी नागरिकांची मागणी आहे याच मार्गावर चिंतामणी विद्या मंदिर तसेच जिल्हा परिषदेची शाळा असल्याने हे शालेय विद्यार्थी देखील याच रस्त्यावरून आपापल्या घरी जात असतात त्यामुळे शाळा भरण्याच्या वेळेला तसेच शाळा सुटण्याच्या वेळेला अपघात होण्याच्या दाट शक्यता आहे त्यामुळे याकडे वाहतूक विभागाने लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे.
