पुणे (हवेलीनामा ऑनलाइन)   लोणीकंद पोलीस स्टेशनाच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार अभिजीत महादेव कांबळे यास  पोलीस आयुक्त पुणे शहर यांनी महाराष्ट्र झोपडपट्टी दादा कायद्या अंतर्गत एक वर्षासाठी स्थानबध्द केल्याचा  आदेश काढल्याने त्याची एका वर्षासाठी कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.
        लोणीकंद पोलीस स्टेशन हद्दीतील मांजरी तसेच आसपासच्या भागात कायम लोकांना दहशतीखाली ठेवुन त्यांना वारंवार त्रास देत असे या परिसरातील रहीवाशी कायम दडपणाखाली वावरत होते, त्यामुळे वारंवार कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवु लागल्याने पोलीस उप आयुक्त पंकज देशमुख, सहा. पोलीस आयुक्त किशोर जाधव,लोणीकंद पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गजानन पवार, पोलीस निरीक्षक गुन्हेचे राजेश तटकरे, यांचे मार्गदर्शनाखाली, पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत टेमगिरे, पोलीस नाईक प्रशांत कापुरे, पोलीस अंमलदार सागर कडु, तुषार पवार यांनी अभिजित कांबळे यांचेवर दाखल गुन्ह्यांचा अभिलेख तपासुन महाराष्ट्र महाराष्ट्र झोपडपट्टी दादा कायद्यान्वये कारवाई होण्याबाबत पोलीस आयुक्त पुणे शहर यांचेकडे प्रस्ताव पाठवला. केला होता.त्यावर कारवाई करण्यात आली असुन त्याला येरवडा मध्यवर्ती कारागृह पुणे येथे स्थानबध्द केले आहे.
         बसदरची कामगिरी पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, अप्पर पोलिसआयुक्त नामदेव चव्हाण,  पोलिस उप आयुक्त पंकज देशमुख, सहा. पोलीस आयुक्त किशोर जाधव,  वरिष्ठ पोलीस निरीक्षक  गजानन पवार, पोलीस निरीक्षक ( गुन्हे)  राजेश तटकरे, यांच्या  मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत टेमगिरे, पोलीस नाईक प्रशांत कापुरे, पोलीस अंमलदार सागर कडु, तुषार पवार यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *