पुणे (हवेलीनामा ऑनलाइन) सहकाराचे महाराष्ट्रातील नेत्यांनी कसे वाटोळे केले याचे उत्तम उदाहरण म्हणजे थेऊर येथील यशवंत सहकारी साखर कारखाना होय,ज्या कारखान्यावर तथाकथित असलेल्या कर्जाच्या दहापट संपत्ती असताना केवळ कोणाच्या तरी हट्टासाठी कोणाच्यातरी अट्टहासाठी ही सहकाराची दौलत सादत पडली आहे असे शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी आज शासनाच्या धोरणावर घणाघात केला.
माजी खासदार व शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी हे आज थेऊर येथे भेटीवर असताना त्यांनी गेली अकरा वर्षे सडत पडलेल्या यशवंत सहकारी साखर कारखान्याला भेट दिली यावेळी यशवंत चे माजी संचालक पांडुरंग काळे,अँड.योगेश पांडे,अँड.अक्षय दांगट,मुंबई महापौर केसरी आबा काळे, काशिनाथ काळे,साहेबराव बांगर,रमेश काळे, एकनाथ काळे,रमेश कुंजीर, सुखराज कुंजीर,प्रकाश पायगुडे, प्रकाश कुंजीर, माजी ग्रामपंचायत सदस्य रामभाऊ कुंजीर, गंगाराम कुंजीर आदी शेतकरी सभासद उपस्थित होते.
कारखान्याची पाहणी केल्यावर शेट्टी म्हणाले की, यशवंत सहकारी साखर कारखान्यावर असलेले कर्ज हे मुळात कारखान्यावर कर्ज लादलेले आहे तरीही येथे उपलब्ध असलेल्या डिस्ट्रीलरी प्रकल्प, आणि असलेले गोडाऊन जरी भाड्याने दिले असते तरीही बरेच कर्ज फिटले असते परंतु कोणाच्या तरी अट्टहासाठी ही सहकाराची दौलत सडत पडली आहे.याठिकाणी कामगारांनी घाम गाळला,येथे बैलाची घुंगर वाजली,तेथे आज खंडहर तयार झाले,केवळ राजकारण्यांनी सहकाराचे वाटोळे केल्याचे हे उत्तम उदाहरण यशवंत सहकारी साखर कारखाना होय.
यावेळी अँड योगेश पांडे यांनी सांगितले की, यशवंत म्हणजे कारखाना बळकावण्याचा फासलेला प्रयोग आहे,या कारखान्याच्या शेतकऱ्यांनी संबंधित बँकांना न्यायालयात हिशेब सादर करावेत अशी मागणी केली तर त्याच्याकडे तो उपलब्ध नाही आम्ही आमचे अकाउंट तयार ठेवले आहे परंतु आजपर्यंत त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही त्यामुळे हा न्यायालयाचा अवमान यांच्याकडून होत आहे.

