लोणी काळभोर (हवेलीनामा ऑनलाइन)   लोणी काळभोर येथे बागुलशा-वली दर्गा तिथी प्रमाणे दि.१२,१३,१४ ऑक्टोबर २०२१ रोजी दर्गा ट्रस्टच्या वतीने  साध्या पध्दतीने उरूस साजरा करण्यात आला.
        देशात सध्या कोविडचे  संकट टळले नसून त्याचे भान ठेवून अगदी साध्या पद्धतीने दि.१२ रोजी संदल,दि. १३ रोजी ऊरूस लंगर (महाप्रसाद),व
दि.१४ रोजी जियारत विधिप्रमाणे साजरे केले.
हा कार्यक्रम करत असताना दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांना सुरक्षित अंतर ठेवून दर्शन दिले जात होते.
प्रौढ व महिलांना साठी १७५० पाकीट घर पोच
लंगर (महाप्रसाद) दिला गेला. शेतकरी बांधवांसाठी व कोवीडरूपी संकटातून लवकरात लवकर सुटका सर्व जातीधर्माच्या लोकांची होण्यासाठी प्रार्थना केली. सरकारने चालवलेल्या स्वातंत्र्याचा आमृत मोहस्तव अभियाना व कवचकुंडल मोहिम कोविड लसीकरणात भाग घेण्यासाठी लोकांना जनजागृती करून दर्गा ट्रस्टतर्फे आव्हान केले गेले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *