पुणे (हवेलीनामा वृतसमूह) रांजणगाव एमआयडीसीत चमाडीया गोडाउन मधून बिस्किट, साबण, सिगारेट व ईतर वस्तुची चोरीचा गुन्हा रांजणगाव पोलीसांनी ७२ तासात उघडकिस आणून चोरीस गेलेला सर्व मुद्देमाल व गुन्ह्यात वापरलेले वाहन असा एकूण ६८,००,०००/- रु किमतिचा मुद्देमाल जप्त केला.

शिरूर तालुक्यातील रांजणगाव येथील चमाडीया गोडाउन मध्ये आयटीसी कंपनिचे सिगारेट, बिस्किट, साबण, सिगारेट वगैरे माल ठेवला जातो तेथुन तो माल ट्रान्सपोर्टच्या वाहनां मधुन विक्रेत्यांकडे पाठवला जातो,यासाठी मुव्हिंग लॉजिस्टिक प्रा लि चे चार इलेक्ट्रिक पिकअप असुन त्यात रात्रीचे वेळी माल भरला जातो त्यावाच फायदा घेउन दि १७ डिसेंबर रोजी पहाटे ०६:४० वा सुमारास अज्ञात चोरट्याने माल भरुन ठेवलेल्या पिकअप चालु करुन गेटवर चलनाची नोंद करुन माल भरलेला इलेक्ट्रीक पिकअप सह ६५,९८,८९७/- रु किमतीची सिगारेट व इतर मालाची चोरी केला होता, अशी तक्रार रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनला दिपक देवदास शिंदे रा लोणीकंद, यांनी फिर्यादी दिली होती.

या गुन्ह्यात मोठ्या प्रमाणात साहित्य चोरी झालेले असल्याने तसेच औद्यागिक क्षेत्रात अशा प्रकारच्या मोठ्या चोरीच्या घटणा देशाच्या आर्थिक प्रगतीस खुप धोकादायक आहेत. त्यामुळे पोलीस अधिक्षक संदिपसिंह गिल्ल यांनी विशेष लक्ष घालुन गुन्हा उघडकिस आणण्याचे दृष्टिने वेगवेगळी पथके नेमून योग्य त्या सुचना दिल्या, त्यानुसार पोलीस निरिक्षक महादेव वाघमोडे यांनी रांजणगाव एमआयडीसी कडील तपास पथकातिल पोलीस उपनिरीक्षकअविनाश थोरात, सहा फौजदार दत्तात्रय शिंदे, पोलीस शिपाई उमेश कुतवळ, योगेश गुंड, किशोर शिवणकर यांना योग्य त्या सुचना दिल्या.चोरट्यांनी चोरी केलेली मुव्हिंग लॉजिस्टिकची पिकअप ही चमाडीया गोडाउन पासुन काही अंतरावर सोडुन त्यातुन फक्त ५४,५३,०००/- रु किमतीची सिगारेट घेउन गेल्याचे निष्पन्न झाले, त्यानुसार रोडवरिल सुमारे शंभर पेक्षा जास्त सीसीटिव्ही चेक केले. तपास सुरु असताना पोलीस अंमलदार उमेश कुतवळ हे वाघोली परिसरात संशयित वहानाचा शोध घेत असताना त्यांना सदरचे वाहन हे कावेरी हॉटेल वाघोली येथे डिलिव्हरी करत असताना मिळुन आले, त्यानुसार सदर वाहनाचे मालक व सुपरवायझर, वालक यांचेकडे तपास केला असता सुपरवयाझर प्रथमेश चव्हाण याने दिपक ज्ञानेश्वर ढेरंगे व अल्ताफ आयुब मुल्ला यांना हे वाहन हे चोरी करणे करीता दिल्याची कबुली दिली, त्यावरुन ।) प्रथमेश ज्ञानेश्वर चव्हाण रा वाघोली ता हवेली जि पुणे यास अटक करण्यात आली. तपासात त्याच्या कडुन चोरीस गेलेला मुद्देमाल त्याचप्रमाणे गुन्ह्यात वापरलेले वाहन असा एकुण ६८,००,०००/- रु चा मुद्देमाल जप्त करण्यात रांजणगाव एमआयडीस पोलीस स्टेशन कडील तपास पथकास यश आलेले आहे,

दोन आरोपीचा शोध सुरु असून यातील दिपक ज्ञानेश्वर ढेरंगे हा पोलीस अभिलेखा वरील सराईत असुन त्याचे वर शिक्रापुर पोलीस स्टेशन, सिंहगडरोड, लोणीदंक पोलीस स्टेशन येथे चोरीचे एकुण ०८ गुन्हे दाखल असल्याची माहीती प्राप्त झाली आहे.

ही कामगिरी पोलीस अधिक्षक संदिपसिंह गिल्ल, रमेश चोपडे, अप्पर पोलीस अधिक्षक, प्रशांत ढोले उपविभागिय पोलीस अधिकारी शिरुर, यांचे मार्गदर्शना खाली महादेव वाघमोडे रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन,पोलीस उपनिरीक्षक अविनाश थोरात, सहा फौजदार दत्तात्रय शिंदे,पोलीस शिपाई उमेश कुतवळ, योगेश गुंड, किशोर शिवणकर पो हवा माणिक काळकुटे, अमोल रासकर यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *